यवतमाळ : जिल्हा परिषद सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असावा, या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य सुलोचना भोयर यांचा पाठपुरावा सुरू होता, अखेरीस त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन बाबासाहेबांची प्रतिमा सभागृहात लावण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा सर्व शासकीय कार्यालयांमध्ये लावण्याचा शासन निर्णय आहे. शिवाय यावर्षी बाबासाहेबांच्या जयंतीचे १२५ वर्षाचे औचित्य साधून सबंध देशभर समता सामाजिक न्यायवर्ष साजरे करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद प्रशासनाला बाबासाहेबांचा फोटो मुख्य सभागृहात लावण्याचा विसर पडलेला होता. याबाबत जिल्हा परिषद सदस्य सुलोचना मोहन भोयर यांनी ही मागणी सभागृहात वारंवार लावून धरली. अखेर त्यांच्या मागणीला यश प्राप्त होऊन जिल्हा परिषद बांधकाम विभागाने जिल्हा परिषदेच्या सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद सभागृहात बाबासाहेबांचा फोटो
By admin | Updated: March 4, 2016 02:26 IST