नांदेड येथे अटक : अल्पवयीन तरुणीची सुटकापुसद : गरीब, गरजू तरुणींना जाळ्यात ओढून देहविक्रय रॅकेट चालविणाऱ्या सिमरन नामक तरुणीला पुसद शहर पोलिसांनी नांदेड येथून अटक केली. तर ज्या पीडितेच्या माध्यमातून पोलीस सिमरनपर्यंत पोहोचले तिची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. देहविक्रय रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी तथा आॅटोरिक्षाचालक मनोज राजपालसिंग ठाकूर (२४) रा.जुना कवठा नांदेड आणि अनिस मिर्झा बेग (२१) रा.शेलू ता.पुसद यांना यापूर्वीच पोलिसांनी अटक करून त्यांची रवानगी केली होती. आॅटोरिक्षाचालक मनोज हा तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना महागडे कपडे व मोबाईल भेट देत होता. यातून तरुणींना देहविक्रीच्या व्यवसायात ढकलत होता. मनोजची प्रेयसी सिमरन (२२) हिच्या माध्यमातून तो रॅकेट चालवित होता. दरम्यान एका तरुणीने राज्याच्या पोलीस महासंचालकाकडे तक्रार पाठवून न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती. त्यावरून पुसद पोलिसांनी नांदेडसह अनेक ठिकाणी रेडलाईट एरियात धाडी टाकून अनेक तरुणींची सुटका केली. त्यात पुसद तालुक्यातील शेलू येथील एका तरुणीचा समावेश आहे. तिची नांदेडच्या बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. या रॅकेटचे जाळे राज्यभर पसरले असून नागपूर, नांदेड, लातूर आणि हैद्राबादपर्यंत जाळे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सिमरनच्या अटकेनंतर या रॅकेटचा भंडाफोड होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
देहविक्रय रॅकेट चालविणारी ‘आँटी’ पोलिसांच्या जाळ्यात
By admin | Updated: June 17, 2016 02:42 IST