शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशकांचा ‘साईड ईफेक्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 22:02 IST

गावपातळीवर सध्या विविध आजारांनी थैमान घातले आहे. त्यामुळे शासकीय व खाजगी रुग्णालयात रुग्णांची मोठी संख्या आढळून येत आहे.

ठळक मुद्देअनेक शेतकरी रुग्णालयात दाखल : कृषी विभागाचे काळजी घेण्याचे आवाहन

गजानन अक्कलवार।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : गावपातळीवर सध्या विविध आजारांनी थैमान घातले आहे. त्यामुळे शासकीय व खाजगी रुग्णालयात रुग्णांची मोठी संख्या आढळून येत आहे. विशेष म्हणजे यात सर्वाधिक रुग्णसंख्याही शेतात कीटकनाशकाच्या फवारणी दरम्यान त्वचारोगाने बाधील झालेल्यांची आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.कळंब तालुक्यातील पार्डी (सावळापूर), दोनाडा, बोरीमहल आदी गावातील शेतकºयांना या रोगाचा सामना करावा लागत आहे. येथीलच ईश्वर पुरुषोत्तम पिसे, मारोती नामदेव वसू व चरणदास पुरुषोत्तम पिसे यांच्या त्वचेवर कीटकनाशक फवारणीचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर यवतमाळ व सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार सुुरू आहे.शेतातील पिकांवर किटकनाशक फवारणी दरम्यान नाक, तोंड व त्वचेच्या माध्यमातून विषबाधा होण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. फवारणी करणारे शेतकरी व मजूरवर्ग या आजाराला बळी पडत आहे. दरदिवशी रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णालयेसुद्धा हाऊस फुल झाले आहेत. या प्रकारामुळे शेतीत घाम गाळणाºया शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे कीटकनाशकांची फरवाणी शेतकरी वर्ग दरवर्षीच करतो. कीटकनाशकामुळे साईड इफेक्ट होणारी एखाद दुसरी घटना घडायची. परंतु यावर्षी अशा घटना मोठ्या प्रमाणात घडू लागल्या आहे. हा सर्व प्रकार वातावरणातील बदलामुळे की किटकनाशकातील रासायनिकतेचा परिणाम आहे, हा संशोधनाचा विषय ठरू पाहत आहे.फवारणीदरम्यान मास्क वापरणे गरजेचेफवारणी करताना सुरक्षेबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे. वाºयाच्या दिशेने फवारणी करावी. त्यामुळे औषधी अंगावर उडणार नाही. नाका-तोंडावर मास्क वापरावा. हात व अंग स्वच्छ धुवावे. पावसाने उसंत घेतल्याने बहुतेक शेतकरी फवारणीकडे वळला आहे. त्यामुळे सुरक्षिततेची काळजी न घेतल्यामुळे कदाचीत त्वचा रोगाचे प्रमाण वाढले असू शकते, अशी माहिती कृषी शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद यादगीरवार यांनी दिली.मागील आठवड्यापासून किटकनाशक फवारणी करताना विषबाधा होण्याचे प्रमाण वाढत आहे. रोज दोन ते तीन रूग्ण रुग्णालयात दाखल होत आहे.- डॉ.रवी पाटील, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय, कळंब