शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

मगर वो शख्स जमी पर खुदा का साया हैं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2015 05:05 IST

जिसका कोई नही उसका तो खुदा हैं यारो... पण हा खुदाही अदृश्य नसतो. तो माणसांच्याच रूपात वावरत असतो.

अनाथाचे आप्त : लाजवंतीचा विवाह ठरणार सद्प्रवृत्तीचे संमेलनयवतमाळ : जिसका कोई नही उसका तो खुदा हैं यारो... पण हा खुदाही अदृश्य नसतो. तो माणसांच्याच रूपात वावरत असतो. अशा देवमाणसांच्या छत्रछायेतच शनिवारी एका अनाथ मुलीचा संसार उजवणार आहे. मुलीचे लग्न म्हणजे एक घर कायमचे सोडून दुसऱ्या घरात जाणे. पण अनाथ लाजवंती आयुष्यात पहिल्यांदा ‘घरात’ जाणार आहे. परिवारात जाणार आहे. शनिवारी नंदूरकर महाविद्यालयाच्या प्रांगणात लाजवंतीच्या अनोख्या विवाहाचा समारंभ पार पडतोय. लाजवंती नावाची ही उपवर मुलगी अनाथ. पण शंकरबाबा पापळकर नावाच्या विभूतीने तिचे पितृत्व स्वीकारले. शंकरबाबांच्या वझ्झर (जि. अमरावती) येथील बालगृहात लाजवंती लहानाची मोठी झाली. तिच्यासारखेच आणखी १०० अनाथ जीव शंकरबाबांच्या पितृछायेत समृद्ध होत आहेत. या बालगृहातील १६ अनाथांचे विवाह शंकरबाबांनी मोठ्या थाटामाटात पार पाडले. आता लाजवंतीच्या विवाहासाठीही त्यांनी समाजातील सद्प्रवृत्तीला साद घातली अन् आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसचा श्रीराम हा तरुण लाजवंतीच्या पुढच्या प्रवासाचा भागीदार बनला. लाजवंती आणि श्रीरामच्या विवाहासाठी यवतमाळातील सेवाभावी माणसांनी धाव घेतली. लोकमत सखी मंचच्या प्रमुख सीमा दर्डा यांनी लाजवंतीच्या हळद-मेहंदीच्या कार्यक्रमाचे यजमानपद स्वीकारले. सखी मंचच्या सर्व सदस्यांनी गुरुवारी अत्यंत उत्साहाने लाजवंतीचे हात मेहंदीने सजविले. जिला आई नाही, अशा लाजवंतीचे अंतरंग ‘सखी’च्या सहवासाने फुलारून गेले. बोहल्यावर चढण्यापूर्वीची सर्वसामान्य तरुणीची उत्सुकता-हुरहुर काय असते, तिच्या भावविश्वात काय भाव उसळलेले असतात, हे जाणून घेण्यासाठी मैत्रिणींचा मोठा गोतावळा पिंगा घालत असतो. अनाथ लाजवंतीच्या दिमतीलाही लोकमत सखी मंचाने ही हक्काची मैत्री दिली. लाजवंतीच्या लग्नासाठीही समाज एकवटला आहे. नंदूरकर महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या विवाहात चक्क पालकमंत्री संजय राठोड लाजवंतीचे कन्यादान करणार आहेत. मामकूळ म्हणून प्राचार्य प्रकाश नंदूरकर जबाबदारी पार पाडणार आहेत. तर लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांनी मेहंदीच्या कार्यक्रमातून लाजवंतीला माहेर देऊ केले. शंकरबाबांची लाडकी कन्या नवरी झाली. त्यांच्या बालगृहातील हा सतरावा विवाह समाजाला निश्चितच नवी समज देऊन जाणारा आहे. अनाथांचे बाबा होणारे शंकरबाबा पापळकर, त्यांच्या हाकेला ओ देणारे यवतमाळातील सदगृहस्थ अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाजवंतीचा जोडीदार म्हणून स्वीकार करणारा दिग्रसचा श्रीराम हे सारेच अभिनंदनाचे अधिकारी!आपल्याला कुणीच नाही या भावनेशी आयुष्यभर झगडणारी लाजवंती शनिवारी हजारो नातेवाईकांच्या उपस्थितीत गृहिणी होतेय. बालपणीच आधार देणारे शंकरबाबा अन् आता आयुष्याचा सांगाती बनलेला श्रीराम यांच्याविषयी या नववधूच्या भावना कदाचित अशाच असतील...ये और बात हैं के इन्सान बन के आया हैंमगर वो शख्स जमी पर खुदा का साया हैं...सामाजिक विवाह सोहळा आज ४शंकरबाबा पापळकरांची लाडाकौतुकाची लेक लाजवंती आणि दिग्रस येथील श्रीराम वसंतराव सरमोकदम यांचा सामाजिक विवाह सोहळा शनिवार १२ डिसेंबर सायंकाळी ५ वाजता येथील डॉ. नंदूरकर विद्यालयात संपन्न होत आहे. पालकमंत्री संजय राठोड सपत्नीक कन्यादान करणार आहे. आंतरराष्ट्रीय गायक साईराम अय्यर आणि प्रसिद्ध गायिका धनश्री देशपांडे यांच्या संगीत रजनीचे आयोजन केले आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.