शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वनहद्दीतील रस्त्यांच्या दुरुस्तीस परवानगी; वनमंत्र्यांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 17:24 IST

Yawatmal News Forest News वनमंत्री संजय राठोड यांनी वनहद्दीतून गेलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यास मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देगौणखनिज बाहेरुन आणण्याचे बंधन मात्र कायम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वनांच्या हद्दीतून गेलेल्या रस्त्यांवर साधी मातीही टाकण्याची परवानगी नव्हती. कुणी तसा प्रयत्न केल्यास वन अधिकारी थेट एफआयआरची धमकी देत होते. परंतु वनमंत्री संजय राठोड यांनी या अडचणी समजून घेत वनहद्दीतून गेलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यास मंजुरी दिली आहे.राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा नोडल अधिकारी संजीव गौर यांनी १३ ऑक्टोबर रोजी या संबंधीचे आदेश राज्यातील सर्व वन अधिकाऱ्यांसाठी जारी केले आहेत. वन विभागाच्या हद्दीतील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविले जात नाही, त्यामुळे अपघात वाढले, पर्यटकांचा जीव धोक्यात आला, अशी ओरड होती. याच मुद्यावर ७ ऑक्टोबर रोजी वनमंत्री संजय राठोड यांनी आढावा बैठक घेतली. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हेसुद्धा या बैठकीला उपस्थित होते. त्यांनीसुद्धा परवानगी बाबतच्या अडचणी सांगितल्या.

थेट एफआयआर, वाहने जप्तीची धमकीखड्डे पडलेल्या रस्त्यावर वन अधिकारी साधी मातीही टाकू देत नाही, गुन्हे दाखल करण्याची, कंत्राटदारांची वाहने जप्त करण्याची धमकी देतात, असे सांगितले गेले. एवढेच नव्हे तर सार्वजनिक बांधकाम खात्यालाही वन हद्दीत रस्त्याचे कोणतेही काम करण्यास वन अधिकाऱ्यांची मनाई होती. अखेर वनमंत्र्यांनी याबाबत निर्णय घेतला.

रस्त्यांची रुंदी वाढविण्यास मनाई कायमवन हद्दीतून गेलेल्या रस्त्याची रुंदी तीन मीटर आहे. ती वाढविता येणार नाही, परंतु त्या भागातील ग्रामीण, जिल्हा मार्गावरील खड्डे बुजविता येतील, त्यासाठी लागणारे माती, मुरुम व इतर गौण खनिज मात्र वन हद्दीच्या बाहेरुन आणावे लागणार आहे.

वनांच्या जिल्ह्यातील समस्या सुटलीया निर्णयाने जंगलातून जाणाऱ्या मार्गावरील खड्डे बुजविण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आदी जिल्ह्यांमध्ये वनांचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये ही समस्या अधिक आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग