लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना विविध विभागामार्फत राबविली जात आहे. पाणी व मृदा व्यवस्थापन हा यात मुख्य घटक आहे. जिल्ह्यात बऱ्यापैकी सरासरी पाऊस होत असूनही काही गावाना पाणी समस्या कायम भेडसावते. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, लाभधारक शेतकरी, ग्रामपंचायत पदाधिकारी आदींनी सक्रिया सहभाग घेऊन कायमची उपाययोजना आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) यांच्या संयुक्त विद्यमाने जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या कामांचे हस्तांतरण, लोकसहभागाने योजनांची देखभाल, दुरुस्तीबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण व कार्यशाळा येथील बचत भवनात घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अध्यक्षस्थानाहून बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्या सामाजिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. राजेंद्र पुराणिक, प्रा. किशोर राठोड, प्रा. मोहन नारखेडे उपस्थित होते. उपवनसंरक्षक भानुदास पिंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कार्यशाळेचे आयोजक मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी चेतन कलशेट्टी, टाटा ट्रस्ट एनजिओचे शंकरराव अमिलकंठवार आदी उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. सिंचनासंबंधी येणाऱ्या विविध अडचणींवर मात कशी करावी याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी ए.आर. पांडे यांनी जलयुक्त शिवार अंतर्गत कार्याची माहिती प्रास्ताविकातून दिली. प्रशिक्षणाचे प्रेझेंटेशन कनिष्ठ अभियंता स्वप्नजा जाधव यांनी केले. संचालन भाग्यश्री तंबाखे, आभार मोहना कडू यांनी मानले.
जलसंवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 22:34 IST
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना विविध विभागामार्फत राबविली जात आहे. पाणी व मृदा व्यवस्थापन हा यात मुख्य घटक आहे. जिल्ह्यात बऱ्यापैकी सरासरी पाऊस होत असूनही काही गावाना पाणी समस्या कायम भेडसावते.
जलसंवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक
ठळक मुद्देजिल्हाधिकारी : मृद व जलसंधारण विभागातर्फे मार्गदर्शन