शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनात होरपळली जनता

By admin | Updated: June 5, 2014 00:03 IST

परिसरात सरासरी १0 ते १२ तासांचे भारनियमन सुरू असल्याने जनता होरपळत आहे. सध्या सूर्य आग ओकत असताना त्याच वेळेत भारनियमन होत असल्याने ग्राहकांमद्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

घोन्सा : परिसरात सरासरी १0 ते १२ तासांचे भारनियमन सुरू असल्याने जनता होरपळत आहे. सध्या सूर्य आग ओकत असताना त्याच वेळेत भारनियमन होत असल्याने ग्राहकांमद्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.घोन्सा येथील ३३ के.व्ही. क्षमता असलेल्या उपकेंद्राअंतर्गत तीन फिडर येतात. त्यामध्ये साखरा, खडकडोह, सुसरी पेंढरी येथे फिडर आहे. त्यावरून परिसरातील एकूण ३८ ते ४0 गावांना वीज पुरवठा केला जातो. त्यामधील जवळपास चार ते पाच गावांत गावठाण फिडर योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र ही योजना कार्यान्वित असताना सुध्दा येथे भारनियमन केले जात आहे. त्यामुळे शासनाची गावठाण फिडर योजना कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. जेथे गावठाण फिडर योजना कार्यान्वित करण्यात आली, तेथेसुध्दा जवळपास सहा तासांचे भारनियमन केले जात आहे. अनेक गावांमध्ये ही गावठाण फिडर योजना सुरू झाली नाही आणि ती येणार्‍या पावसाळ्यापर्यंतसुध्दा सुरू होणार नाही, अशी माहिती येथील कनिष्ठ अभियंत्यांनी दिली. तसेच भारनियमनाव्यतिरिक्तसुध्दा येथे वीज गुल होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यावेळीही भारनियमनात कुठलाही फेरबदल केला जात नाही. या भारनियमनाविषयी अधिकार्‍यांना विचारले असता, ते देयकाच्या वसुलीनुसार प्रत्येक गावाचा ग्रुप ठरविण्यात आल्याचे सांगतात. त्यानुसार भारयिनमन करण्यात आल्याचे सांगून ते ग्राहकांची बोळवण करतात. ज्या ग्राहकांनी वीज देयक भरले नाही, त्यांचा वीज पुरवठा महावितरणतर्फे खंडित करण्यात येतो.  परिणामी वसुली मात्र १00 टक्के होताना दिसत आहे. ही सत्य परिस्थिती असताना अधिकारी मात्र ग्राहकांना उडवाउडवीचे उत्तरे देताना दिसत आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे नागरिकांना थंड हवेची आवश्यकता असते. परंतु त्याचवेळी वीज गुल होत असल्यामुळे सामान्य जनता होरपळत आहे. त्यातून उष्माघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्राहकांच्या संतापाचा आता स्फळट होण्याची शक्यता बळावली आहे. (वार्ताहर)