दरड कोसळली : सिंचनाचे टाके भुईसपाटमुळावा : परिसरात शनिवारी पहाटे ३ ते ५ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली. नदी पात्राच्या वेगवान प्रवाहामुळे दरड ढासळल्याने उपसा सिंचन योजनेंतर्गत बांधण्यात आलेले टाके पूर्णत: भुईसपाट झाले. सन १९७५ साली तिवरंग येथे उपसा सिंचन योजनेतून हे टाके बांधण्यात आले. त्यात ४० अश्वशक्तीचे दोन पंप बसविण्यात आले असून आळीपाळीने हे पंप सुरू करण्यात येतात. परंतु १० वर्षांपासून ही योजना बंद आहे. वसंत सहकारी साखर कारखान्याने उमरखेड तालुक्यातील आठ उपसा सिंचन योजना शासनाकडून विकत घेतल्या. परंतु कारखाना प्रशासनाला नियोजन न जमल्याने सर्व योजना सध्या बंद आहेत. नदी पात्रापासून ५० फूट उंचावर हे टाके होते. मात्र पुरामुळे दगडी बांधकाम असलेले टाके कोलमडून पडले. त्यामध्ये लोखंडी पाईप व दोन मोटारपंप ढिगाऱ्याखाली दबले आहे. सुमारे दीड वर्षांपासून नदीत पाणी नव्हते. त्यामुळे पूर पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी जमली होती. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (वार्ताहर)
पैनगंगा नदीला पूर
By admin | Updated: June 26, 2016 02:25 IST