सोमवारपासून उपोषण : कर्मचाऱ्यांना सहभागाचे आवाहनयवतमाळ : विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी २१ डिसेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत साखळी उपोषणाला बसणार आहेत. या उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.१ नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना अंशदायी निवृत्ती योजना लागू आहे. ही निवृत्ती योजना नसून गुंतवणूक योजना आहे. ती कर्मचाऱ्याला व त्याच्या कुटुंबाला कोणतेही संरक्षण देत नाही. त्यामुळे ही योजना बंद करून मनासेनी १९८२ नुसार सेवानिवृत्ती योजना सुरू करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. २००५ पासून वेतनातून अंशदायी निवृत्ती वेतन योजनेची कपात केलेली रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा नाही. आजपर्यंत एकाही वित्तीय वर्षाची हिशेब स्लिप कर्मचाऱ्यांना मिळाली नाही. कपात केलेली रक्कम खात्यात जमा करून प्रत्येक वर्षाची हिशेब स्लिप देण्यात यावी. सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याचा कालावधी संपूनही एकही हप्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला नाही. ती थकबाकी जमा करण्यात यावी आदी मागण्या प्रलंबित आहेत. यासाठी अनेकदा आंदोलने करण्यात आली. परंतु, केवळ आश्वासनेच देण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी २१ डिसेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर उपाषणास बसणार आहेत. याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष पी. एम. शेणमारे, जिल्हा सरचिटणीस अनंत सावळे, उपाध्यक्ष देवानंद गावंडे, स्नेहल काकड, पुनव खामनकर, धनंजय मेश्राम, जगदीश शुक्ला, राजेंद्र आंबीलकर, गणेश खराटे, उमेश सरोदे, अमित कुळकर्णी, राजू वाडी, भगवान खोकले, राहुल लवटे, राजेश इंगोले, रूपेश खापर्डे, कुलदीप चव्हाण, मिलिंद पिंपळशेंडे, राजेंद्र राऊत, गोपाळ ठाकरे आदींनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित
By admin | Updated: December 19, 2015 02:33 IST