शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत शंभरावर ‘डीई’ प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 21:56 IST

जिल्हा परिषदेत चौकशीचा केवळ बागुलबुवा निर्माण केला जातो. प्रत्यक्षात तत्काळ चौकशी पूर्ण होऊन संबंधितांवर कारवाई केली जात नाही.

ठळक मुद्देचौकशीचा केवळ बागुलबुवा : प्रत्यक्ष कारवाईला बगल, कुणालाही भीती नाही, हिंमत वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेत चौकशीचा केवळ बागुलबुवा निर्माण केला जातो. प्रत्यक्षात तत्काळ चौकशी पूर्ण होऊन संबंधितांवर कारवाई केली जात नाही. त्यामुळे या मिनी मंत्रालयात कुणीच कुणाला जुमानत नसल्याचे व त्यामुळे हिंमत वाढल्याने आणखी कारनामे सुरूच असल्याचे दिसून येते. आजही जिल्हा परिषदेमध्ये शंभरावर अधिकारी-कर्मचाºयांच्या खातेनिहाय चौकशी (डीई) प्रलंबित आहेत. त्या वेगाने निकाली निघाव्या म्हणून प्रशासनाकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाही. अनेक पदाधिकारी व बहुतांश सदस्य अभ्यासू नसल्याचाही हा परिणाम मानला जात आहे.जिल्हा परिषदेत १३ विभाग आहेत. या सर्व विभागांत जवळपास २० हजारांच्या आसपास अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहे. यात शिक्षक व आरोग्य कर्मचाºयांची संख्या मोठी आहे. कार्यरत कर्मचाºयांकडून अनेकदा चुका होतात. अनेकदा निधीत अफरातफर होते. कर्तव्य बजावताना अनेक कर्मचारी चुकतात. काही जाणूनबुजून चुका करतात, तर काहींकडून अनवधानाने चूक घडते.अधिकारी, कर्मचाºयांनी अपहार केल्यास, कर्तव्यात कसूर केल्यास त्यांच्याविरूद्ध निलंबनाची कारवाई केली जाते. काहींची विभागीय चौकशी (डीई) सुरू केली जाते. निलंबन काळात अनेक कर्मचाºयांना फुकटचा अर्धा पगार देऊन पोसले जाते. सहा महिन्यानंतर हाच पगार दोन तृतीयांश होतो. निलंबन काळात कर्मचाºयाला कोणतेही काम नसते. फुकटचा पगार घेऊन सुटीही मिळते. तीच गत डीर्इंची आहे. जिल्हा परिषदेत सध्या डीईची १०० प्रकरणे रखडली आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून संबंधित कर्मचाºयांची विभागीय चौकशी सुरू आहे.पाच वर्षांपासून चौकशी तरीही निष्कर्षापासून दूरविभागीय चौकशीच्या नावाखाली संबंधित कर्मचाºयाला वारंवार बोलाविले जाते. वारंवार त्यांचे बयाण घेतले जाते. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या अधिकारी, कर्मचाºयांचेही म्हणणे ऐकून घेतले जाते. नंतर पुढील तारीख दिली जाते. ‘तारीख ते तारीख’ असा हा सिलसिला गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. तरीही चौकशी अधिकारी निष्कर्षाप्रत पोहोचू शकले नाही. त्यामुळे या प्रकरणात कुठे तरी पाणी मुुरत असल्याचा संशय बळावत आहे. मात्र ही न्यायालयीन प्रक्रिया असल्याने चौकशीला कालमर्यादा घालता येणार नाही, असे प्रशासनाचे मत आहे.