शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

अपघातात बालरोग तज्ज्ञ ठार

By admin | Updated: February 3, 2017 02:11 IST

अज्ञात वाहनाने कारला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात उमरखेड येथील बालरोग तज्ज्ञ जागीच ठार तर कारमधील इतर चार डॉक्टर गंभीर जखमी झाले.

चार डॉक्टर गंभीर : उमरखेडच्या सुकळी गावाजवळ कारला धडक उमरखेड : अज्ञात वाहनाने कारला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात उमरखेड येथील बालरोग तज्ज्ञ जागीच ठार तर कारमधील इतर चार डॉक्टर गंभीर जखमी झाले. हा अपघात नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील सुकळी गावाजवळ बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान घडला.डॉ.संदीप काशीनाथ वानखेडे (३७) रा.साखरा असे मृत डॉक्टरचे नाव आहे. तर डॉ.संभाजी डोगे, डॉ.आशीष उगले, डॉ.श्रीराम रावते, डॉ.स्वप्नील अग्रवाल असे जखमी डॉक्टरांची नावे आहे. बुधवारी रात्री कार क्र.एम.एच.२९/ए.आर.-४३४९ ने सर्व डॉक्टर महागाववरून उमरखेडकडे येत होते. त्यावेळी सुकळी गावाजवळ अज्ञात वाहनाने कारला धडक दिली. त्यात बालरोग तज्ज्ञ डॉ.संदीप वानखेडे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यात ते जागीच ठार झाले, तर कारमधील इतर चार डॉक्टर गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच माजी आमदार प्रकाश देवसरकर, अ‍ॅड.संतोष जैन, डॉ.अरुण बंग यांनी घटनास्थळावर धाव घेतली. सर्व जखमींना उमरखेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.बालरोग तज्ज्ञ असलेले डॉ.वानखेडे हे तालुक्यातील साखरा गावचे रहिवासी असून उमरखेड येथे त्यांचा दवाखाना आहे. गोरगरिबांना नि:शुल्क सेवा देणारे डॉक्टर म्हणून ते परिचित होते. त्यांच्या निधनाचे वृद्ध धडकताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. डॉ.वानखेडे यांच्या मागे पत्नी डॉ.सारिका वानखेडे, मुलगी, आई, वडील आणि भाऊ अ‍ॅड.श्यामराव वानखेडे असा परिवार आहे. (शहर प्रतिनिधी)