शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमिक शिक्षकांचे पगारासाठी धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 22:14 IST

गेल्या १७ वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या उच्च माध्यमिक शिक्षकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्दे१०० टक्के तरतूद करा : हिवाळी अधिवेशनावरही धडक देणार

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : गेल्या १७ वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या उच्च माध्यमिक शिक्षकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. १०० टक्के आर्थिक तरतूद करून तातडीने वेतन सुरू करावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी सोमवारी धरणे आंदोलन केले.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील तिरंगा चौकात महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षक कृती समितीद्वारे हे धरणे आंदोलन करण्यात आले. हिवाळी अधिवेशनापूर्वी अनुदान पात्र शाळांची यादी १०० टक्के आर्थिक तरतुदीसह जाहीर न केल्यास ११ डिसेंबरपासून नागपूर विधानभवनासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे. संचालक व आयुक्त कार्यालयातून मूल्यांकन पात्र प्रस्ताव त्वरित मंत्रालयात पाठविणे, शिक्षकेतर कर्मचाºयांची पदे संचमान्यतेत निर्माण करून वैयक्तिक मान्यता देण आदी मागण्याही निवासी उपजिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या.वेतन मिळावे म्हणून आजपर्यंत २०४ वेळा विविध स्तरावर आंदोलने करण्यात आली. २६ फेब्रुवारी २०१४ रोजी शासनाने उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान मिळावे यासाठी मूल्यांकन केले. परंतु, त्यानंतर तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही मूल्यांकन पात्र शाळांची यादी शासनाने जाहीरच केलेली नाही. अनेक शाळांचे मूल्यांकन प्रस्ताव शिक्षण उपसंचालक आणि संचालक कार्यालयात जैसे थे पडून आहेत. २००१ पासून विनावेतन काम करीत असलेल्या शिक्षकांवर आता उपासमारीची वेळ आलेली आहे. आर्थिक विवंचनेमुळे अनेकांवर मानसिक दडपणही वाढत आहे. त्यामुळे मागणी पूर्ण न झाल्यास नागपूर विधानभवनासमोर बेमुदत धरणे आंदोलन, तसेच सर्व महाविद्यालये बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम येरेकार, उपाध्यक्ष प्रा. आनंद चौधरी, जिल्हा सचिव प्रा. संदीप विरुटकर, प्रा. उमाशंकर सावळकर, एल.एस.पायलवार, प्रा. नंदकुमार पवार, प्रा. श्रीकांत लाकडे, प्रा. आकाश पायताडे, प्रा. किशोर आगुलवार, प्रा. महेंद्र वाडेकर आदींनी दिला.