शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

शिक्षकेतरांची वेतनश्रेणी लालफितीत अडकली

By admin | Updated: November 23, 2014 23:26 IST

राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्न गेली २४ वर्षांपासून रखडलेला आहे. या संदर्भात कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांना निवेदन सादर केले.

कास्ट्राईबचे निवेदन : २४ वर्षांपासून पाठपुरावायवतमाळ : राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्न गेली २४ वर्षांपासून रखडलेला आहे. या संदर्भात कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांना निवेदन सादर केले. दरम्यान, या व इतर विषयांसंदर्भात २४ नोव्हेंबरला मंत्रालयात होणाऱ्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बैठकीकडे या कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी १ एप्रिल २०१० च्या शासन निर्णयानुसार संपूर्ण महाराष्ट्रात यापूर्वी लागू करण्यात आलेली आहे. मात्र अशासकीय अनुदानित शाळेवरील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. यात दुजाभाव होत असल्याचा आरोप कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने केला आहे.या विषयासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दोन वेळा बैठक झाली. यात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अजूनही करण्यात आली नाही. हा प्रश्न आमदार देशपांडे यांच्यापुढे शिष्टमंडळाने मांडला. प्रसंगी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्न, सन २०१३-१४ ची संच मान्यता या व इतर प्रश्नांवर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी २४ नोव्हेंबरला मंत्रालयात बैठक बोलाविली आहे. यासाठी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रित केले आहे. यात राज्याध्यक्ष अरुण गाडे, राज्य महासचिव प्रभाकर जीवने यांच्यासह जिल्हा सचिव दत्तात्रेय कांबळे, नेमीनाथ शहाडे, अरुण खंडाळकर, मारोती पारधी, पुंडलिक डोंगरे आदींचा समावेश असणार आहे. या बैठकीत सदर प्रश्न निकाली निघेल, असा विश्वास जिल्हा सचिव दत्तात्रेय कांबळे यांनी व्यक्त केला आहे. वरिष्ठ वेतनश्रेणी मिळावी यासाठी या कर्मचाऱ्यांनी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा केला. परंतु प्रत्येकवेळी आश्वासनं देण्यात आली. आता नवीन शासनाकडून हा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)