शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

पांदण रस्ते अद्याप दुर्लक्षितच

By admin | Updated: May 25, 2015 02:24 IST

महागाव तालुक्यातील मोहदी परिसरातील अनेक पांदण रस्ते पूर्णत: दुर्लक्षित आहेत.

मोहदी : महागाव तालुक्यातील मोहदी परिसरातील अनेक पांदण रस्ते पूर्णत: दुर्लक्षित आहेत. त्यामुळे पांदण रस्ते नसलेल्या गावातील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना आहे. त्यातून पांदण रस्त्याचा विकास करता येणे शक्य आहे. विविध योजनातून पांदण रस्ते मोकळे करणे त्यांचे रुंदीकरण करणे सहज शक्य आहे. सोबतच पांदण रस्ते पक्के करण्यासाठीही सुविधा त्यात आहे. तथापि प्रशासकीय यंत्रणा व जनतेतील समन्वयकाअभावी आणि काही प्रमाणात तांत्रिक अडचणीमुळे पांदण रस्ते रखडलेली आहेत. त्यामुळे शेतात ये-जा करणारे शेतकरी जनावरे यांचे पावसाळ्यात प्रचंड हाल होतात. या परिसरातील मोहदी ते काळी दौ या जुना पांदण रस्ता यापूर्वी गाडी बैलाचा होता. त्यावरून बैलबंडी सहज जात होती. तथापि, सध्या या पांदण रस्त्याने शेतकऱ्यांना शेतात जाणे बैैलगाडी नेणे कठीण झाले आहे. मोहदी ते सातघरी पांदण रस्त्यात तर पावसाळ्यात चिखलामुळे जनावरे फसतात. त्यांच्यासोबतच शेतकऱ्यांचेही हाल होतात. या पांदण रस्त्याची थोड्या अंतरापर्यंत रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेतच आहे. या पांदण रस्त्याने जाणे कठीण झाले आहे. या पांदण रस्त्याने पायदळ जाणे बैलगाडी नेणे कठीण होते. शेतातील पीक घरी आणणे कठीण जाते.बैलाची प्रचंड दमछाक होते. पांदण रस्त्यावर काही ठिकाणी झालेले अतिक्रमणसुद्धा रस्ता अरुंद होण्यास कारणीभूत आहे. परिसरातील पांदण रस्ते शिव रस्ते हे पूर्वी जेवढ्या रुंदीचे होते ते आता तसे राहिले नाहीत. दिवसेंदिवस पांदण आणि शिवरस्ते अरुंद होत आहे. त्यामुळे या रस्त्यावर शेवटच्या टोकाला शेती असलेल्या शेतकऱ्यांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांचा वाद होतात. त्यात एकमेकांची डोके फोडण्यापर्यंत मजल जात. प्रकरण हातघाईपर्यंत जाऊन शेवटी पोलीस ठाणे, तहसीलदार कार्यालयातही पोहोचते. (वार्ताहर)