शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

‘अहिंसा परमोधर्म’च्या घोषणांनी पुसद दुमदुमले

By admin | Updated: April 20, 2016 02:34 IST

अहिंसेचे अग्रदूत भगवान महावीर यांची जयंती मंगळवारी पुसद शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.

पुसद : अहिंसेचे अग्रदूत भगवान महावीर यांची जयंती मंगळवारी पुसद शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी भगवान महावीर जयंती उत्सव समिती व जैन मंदिर संस्थानच्यावतीने शहरातील प्रमुख मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली. आत्मवाद, रत्नत्रयवाद, वस्तू स्वातंत्र्यवाद, अहिंसावाद, अपरिग्रहवाद, अनेकांतवाद, सर्वोदयवाद आदी लोककल्याणकारक सिद्धांतांचा पुरस्कार करणारे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची २६१५ वी जयंती धुमधडाक्यात साजरी झाली. जयंतीनिमित्त येथील चौबारा चौकातील जैन मंदिरापासून सकाळी ९ वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी पुरुष व महिला मंडळींनी अहिंसा परमोधर्म की जय, भगवान महावीर की जय आदी घोषणा दिल्या. या शोभायात्रेत ट्रॅक्टर व रिक्षावर भगवान महावीरांच्या मोठमोठ्या प्रतीमा ठेवलेल्या होत्या. ढोलताशांच्या गजरासह मिरवणुकीत विविध झाँक्या व महिलांचे लेझीम पथक सर्वांचे लक्ष वेधत होते. यावेळी भगवान महावीर की जय, अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणला. ही शोभायात्रा जैन मंदिर, गुजरी चौक, आझाद चौक, महात्मा गांधी चौक, डॉ. आंबेडकर चौक, सुभाष चौक, कापड लाईन, नगिना चौक, देवकृपा चौक, चौबारा चौक मार्गे वाजतगाजत काढण्यात आली. जैन मंदिरात मिरवणुकीचा समारोप झाला. शोभायात्रेतील सहभागी जैन महिला भगिनी व पुरुष बांधवांसाठी भाजप शहराध्यक्ष भारत पाटील, रश्मी पानपट्टे, शिवाजी पवार आदींनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. तर शिवसेनेचे नगरसेवक अ‍ॅड. उमाकांत पापीनवार, तालुका प्रमुख विकास जामकर, अवि बहादुरे, मधुकर कलिंदर, परेश देशमुख आदींनी सुभाष चौकात शोभायात्रेचे स्वागत केले.शोभायात्रेच्या मार्गात धर्मा रुणवाल व अरुण वायकोस मित्र मंडळांनी भाविकांसाठी फराळ व ज्यूसची व्यवस्था केली होती. पुसद शहरचे ठाणेदार अनिल कुरळकर, सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक विशाल बहात्तरे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला. यशस्वीतेसाठी जैन संस्थानचे अध्यक्ष किशोर आहाळे, जितेंद्र रोकडे, संदीप आहाळे, प्रा. सुरेंद्र आहाळे, भारत सोनटक्के, राका आहाळे, हिरा कान्हेड, अ‍ॅड. पवनकुमार जैन, अनुप नरसिंग, अण्णा आहाळे, अरुण वायकोस, अशोक वरवंटे, राजू वाळके, बंडू संगई, विलास नेटके, राजकुमार कान्हेड, अनिल आहाळे, भाऊ गोरे, निता गोरे, अल्पना मोहेकार आदींनी पुढाकार घेतला. (प्रतिनिधी)