शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये दमदार पाऊस

By admin | Updated: August 29, 2014 00:07 IST

गत अडीच महिन्यात पावसाच्या सर्वच नक्षत्राने हुलकावणी दिली. शेतातील पिके करपायला लागली. अशा स्थितीत शेतकरी चिंतेत असताना श्रावण संपताच दमदार पावसाचे आगमन झाले.

शेतकऱ्यांना दिलासा : आतापर्यंत २९२ मिमीची नोंद पुसद : गत अडीच महिन्यात पावसाच्या सर्वच नक्षत्राने हुलकावणी दिली. शेतातील पिके करपायला लागली. अशा स्थितीत शेतकरी चिंतेत असताना श्रावण संपताच दमदार पावसाचे आगमन झाले. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नदी-नाले खळखळून वाहू लागले असून पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पूस धरणाच्या जलसाठ्यात दुप्पट वाढ झाली असून आता ३२ टक्के जलसाठा आहे. पुसद तालुक्यात आतापर्यंत २९२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.गेल्या अडीच महिन्यांपासून पावसाने सतत हुलकावणी दिली. पुसद तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. परिणामी खरीप पिकांची उंची घटली तसेच अनेक भागातील पिके करपली. २५ आॅगस्ट रोजी पोळ्याच्या दिवशी सायंकाळी पुसद शहरात पावसाला प्रारंभ झाला. विजांच्या कडकडाटासह तब्बल चार तास दमदार पाऊस कोसळला. त्यानंतर अधूनमधून रात्रभर रिमझिम पाऊस सुरू होता. २६ आॅगस्ट रोजी दुपारी तब्बल एक तास चांगला पाऊस झाला. २७ आॅगस्ट रोजी दिवसभर ढगाळी वातावरण होते. रात्री १० वाजताच्या सुमारास दीड तास दमदार पाऊस झाला. रात्रीसुद्धा पाऊस सुरूच होता. गेल्या तीन दिवसांपासून पुसद परिसरात पाऊस सुरू असल्याने शेतकरी सुखावला आहे. या पावसाचा फायदा पिकाला होणार आहे. उशिरा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची पिके पाहिजे तेवढ्या प्रमाणात जोमाने येणार नसली तरी या पावसाचा फायदा मात्र निश्चितच होणार आहे.यावर्षी वरूण राजा सुरुवातीपासूनच रुसला होता. जूनमध्ये पावसाने दगा दिला. त्यामुळे काही भागातील पेरण्या उलटल्या. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. त्यानंतरही पावसाची चिन्हे दिसत नव्हती. शेतकऱ्यांचे डोळे आशाकडे लागले होते. पिके पावसाअभावी कोमेजून चालले होते. नदी-नालेही कोरडे पडले होते. पूस धरणात केवळ १६ टक्के जलसाठा होता. त्यामुळे एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून परिसरात पडत असलेल्या पावसाने पूस धरणात ३९०.७५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे, अशी माहिती प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. थंडावाही वाढला आहे. पावसाचा जोर कायम असून पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही अंशी मिटला आहे. मात्र ग्रामीण भागात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. (तालुका प्रतिनिधी)