शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
5
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
6
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
7
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
8
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
9
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
10
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
11
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
12
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
13
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
14
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
15
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
16
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
17
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
18
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
19
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
20
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

पुसदमध्ये दमदार पाऊस

By admin | Updated: June 11, 2016 02:53 IST

बहुप्रतिक्षीत पावसाचे पुसद तालुक्यात गुरुवारी रात्री दमदार आगमन झाले. मान्सूनपूर्व पावसाने नदी-नाले खळखळून वाहू लागले असून

३७ मि.मी. पाऊस : पूस नदी खळखळून वाहू लागली, शेतकरी आनंदलापुसद : बहुप्रतिक्षीत पावसाचे पुसद तालुक्यात गुरुवारी रात्री दमदार आगमन झाले. मान्सूनपूर्व पावसाने नदी-नाले खळखळून वाहू लागले असून गत दोन महिन्यांपासून कोरड्या पडलेले पूस नदीचे पात्र शुक्रवारी दुथडी भरुन वाहतानाचे दृश्य पाहून पुसदकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. शहरात ३७ मिमी पावसाची नोंद झाली असून या पावसाने तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. गत दोन महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या पुसदकरांना गुरुवारी रात्री बरसलेल्या मान्सूनपूर्व पावसाने चांगलाच दिलासा दिला. पुसद शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पूस धरणात अवघे एक टक्का पाणी होते. त्यामुळे शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गुरुवारी झालेल्या पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. सलग दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी सुरू आहे. पुसद तालुक्यातील काही भागात शेतकऱ्यांनी पेरणीही सुरू केली आहे. शुक्रवार सकाळपर्यंत ३७ मिमी पाऊस कोसळल्याचे नोंद तहसील प्रशासनाने घेतली आहे. तालुक्यातील जनुना गावाला वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला. अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडाली असून काहींची घरे कोसळली आहे. तर अंगावर दगड पडल्याने दोन महिलाही जखमी झाल्या. पाण्याचा थेंबही नसलेल्या पूस नदीचे पात्र आता खळखळून वाहू लागले. त्यामुळे पुसद शहरासह आजूबाजूच्या अनेक गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी कमी झाला आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नाला खोलीकरणाची कामे झाली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे. आता मान्सूनपूर्व पाऊस बरसत असला तरी केरळपर्यंत मान्सून आल्याने शेतकऱ्यांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहे. पुसद शहरातील कृषी केंद्रात बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसत आहे. तसेच मान्सूनपूर्व कामांची लगबग वाढली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली असून आता धो-धो पावसाची तेवढी प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. लवकरच दमदार पाऊस बरसेल अशी चिन्हे वातावरणात दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)