नोंदणी २२ पर्यंत : एकाच गटात होणार स्पर्धा, प्रवेश नि:शुल्क यवतमाळ : गणराज्य दिनानिमित्त २५ जानेवारी रोजी प्रेरणास्थळ आयोजन समिती आणि हनुमान व्यायामशाळा क्रीडा मंडळ शारीरिक शिक्षण महाविद्यालयातर्फे येथे देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ स्थानिक दर्डानगरातील प्रेरणास्थळावर दुपारी ४ वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. स्पर्धा एकाच गटासाठी होणार असून प्रवेश विनाशुल्क आहे. सादरीकरणासाठी सात मिनिटांचा वेळ दिला जाईल. प्रत्येक समूहात स्पर्धक संख्या गायक दहा, तर पाच साथीदार आवश्यक आहे. स्पर्धेचे पहिले बक्षीस १५००, दुसरे एक हजार, तिसरे ७५१ रुपये आहे. सर्व गायक स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सहभागासाठी २२ जानेवारीपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. सोबत सहभागी स्पर्धकांचे ओळखपत्र किंवा शाळेच्या लेटरहेडवर यादी द्यावी लागेल. दिल्या गेलेल्या क्रमांकानुसारच गीत सादर करावे लागणार आहे. या स्पर्धेचे प्रकल्प प्रमुख हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळ शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्रा. अजय कोलारकर आहेत. अधिक माहितीसाठी ८८०५८८५६६८ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन महाविद्यालयाचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी केले आहे. (वार्ताहर)
प्रेरणास्थळ आयोजन समितीतर्फे देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा
By admin | Updated: January 19, 2017 00:57 IST