लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटले आहे. दरदिवशी हजारावर रुग्ण सापडत असताना आता ही संख्या तीनशेच्या खाली आली आहे. शनिवारी दिवसभरात केवळ २८८ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. मात्र रुग्ण घटत असले तरी मृत्यूचे आकडे कायम आहेत. शनिवारीही १३ जणांचा बळी गेला. तर ४४३ जण कोरोनामुक्तही झाले.शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ११, तर खासगी रुग्णालयात दोन मृत्यू झाले. मेडिकलमध्ये दगावलेल्यांमध्ये नेर येथील ५१ वर्षीय पुरुष, दिग्रस येथील ५२ वर्षीय पुरुष, तालुक्यातील ७० वर्षीय पुरुष, दारव्हा येथील २६, ६२ वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील ५७, ७० वर्षीय पुरुष, घाटंजी येथील ६५ वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील ६१ वर्षीय पुरुष, उमरखेड येथील ८२ वर्षीय महिला आणि वणी येथील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तर खासगी रुग्णालयात पांढरकवडा येथील ६० वर्षीय पुरुष व घाटंजी येथील ४३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या २८८ जणांमध्ये १७१ पुरुष आणि ११७ महिला आहेत. यात यवतमाळ येथील २५ रुग्ण, आर्णी ३७, बाभूळगाव ११, दारव्हा २५, दिग्रस १७, घाटंजी १३, कळंब ८, महागाव ३, मारेगाव १६, नेर २१, पांढरवकडा २४, पुसद ४, राळेगाव १०, उमरखेड ५, वणी ३४, झरीजामणी २९ आणि इतर शहरातील ६ रुग्ण आहे.
एकूण बळीसंख्या १७०० जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, शनिवारी एकूण ६८९४ अहवाल आले. यापैकी २८८ पॉझिटिव्ह तर ६६०६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३३७१ रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. यापैकी १७१४ रुग्णालयात तर १६५७ गृह विलगीकरणात आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७० हजार ३८७ झाली आहे. २४ तासात ४४३ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ६५ हजार ३१६ आहे. तर जिल्ह्यात एकूण १७०० मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर १२.२४ तर मृत्युदर २.४२ आहे.