शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये पथदिव्यांच्या दुरुस्ती कामाला गती

By admin | Updated: March 12, 2017 00:56 IST

शहरातील बंद असलेल्या पथदिवे दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ झाला असून शहरातील बहुतांश भागातील खांबांवरील पथदिवे प्रकाशमान झाले आहे.

न. प. सभापतींचा पुढाकार : महापुरुषांचे पुतळे प्रकाशमान पुसद : शहरातील बंद असलेल्या पथदिवे दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ झाला असून शहरातील बहुतांश भागातील खांबांवरील पथदिवे प्रकाशमान झाले आहे. विद्युत सभापतींनी यासाठी पुढाकार घेतला असून धार्मिकस्थळे आणि महापुरुषांच्या पुतळ्याजवळील पथदिवे प्राधान्यक्रमाने लावण्यात आले आहे. पुसद शहरात गत काही वर्षांपासून पथदिव्यांची समस्या निर्माण झाला होती. शहरातील अर्ध्यापेक्षा अधिक पथदिवे बंद होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने गत आठवड्यात वृत्त प्रकाशित केले होते. यात शहरातील पथदिव्यांची समस्या मांडण्यात आली होती. त्यानंतर नगरपरिषदेच्या विद्युत सभापतिपदी पंचशीला राहुल कांबळे यांची निवड करण्यात आली. त्यांनी सभापतिपदाचा प्रभार घेताच कामाला सुरुवात केली. आता शहरातील बहुतांश खांबांवरील पथदिवे सुरू झाले आहे. सर्वप्रथम गावातील महापुरुषांच्या पुतळा परिसरात असलेले हायमास्क सुरू करण्यात आले. तसेच शहरातील धार्मिकस्थळ परिसरातील पथदिवे लावल्याचे सभापती पंचशीला कांबळे यांनी सांगितले. नगरपरिषदेचे चार आणि कंत्राटदाराचे चार कर्मचारी शहरात पथदिव्याचे काम करीत असून अग्निशमन दलाचे कर्मचारीही मदतीला घेण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. साधन सामुग्रीचा अभाव असला तरी शहरातील पथदिवे पूर्णपणे लावण्यात येतील. नागरिकांच्या आलेल्या तक्रारी तत्काळ सोडविल्या जात असून नागरिकही समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष अनिताताई नाईक, आमदार मनोहरराव नाईकांच्या पत्नी असल्याने शहरातील पथदिव्यांची समस्या तत्काळ मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले. मी स्वत: कर्मचाऱ्यांना घेवून प्रत्येक वॉर्डात फिरत असून वीज अभियंताही सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शहरातील पथदिव्यांचा अभ्यास असलेले वीज विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी बलदेव चव्हाण यांचीही मदत घेत असल्याचे त्यांनी सांगितले. थेट जनतेशी संवाद साधून पथदिव्यांची समस्या लवकरच निकाली काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (कार्यालय चमू)