शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

शिवणकलेतून दाखविला आत्मनिर्भरतेचा मार्ग

By admin | Updated: July 10, 2017 01:06 IST

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या येथील रामकिसन सारडा चॅरिटेबल ट्रस्टने महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला आहे.

सारडा ट्रस्टचा पुढाकार : उमरखेडमधील गरीब महिलांना मोफत प्रशिक्षणलोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या येथील रामकिसन सारडा चॅरिटेबल ट्रस्टने महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. तब्बल २५ गरीब महिलांना शिवणकलेचे प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर केले आहे. उमरखेड येथील सारडा ट्रस्टचे संचालक पुरुषोत्तम सारडा दरवर्षी लोकोपयोगी उपक्रम राबवितात. वृक्ष संवर्धन आणि संगोपनाचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. शेकडो वृक्ष लावून त्यांचे स्वखर्चाने जतन केले आहे. त्यांना परिसरात वृक्षमित्र म्हणूनच ओळखले जाते. आता या सारडा ट्रस्टने महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. गोरगरीब महिलांना आपल्या पायावर उभे राहता यावे, यासाठी त्यांना शिवणकला प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यावर्षी त्यांनी २५ गरीब होतकरू महिलांना जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत २५० रुपये विद्यावेतन देवून शिवणकलेचे संपूर्ण प्रशिक्षण मोफत दिले.या प्रशिक्षणाची सांगता नगराध्यक्ष नामदेव ससाने व त्यांच्या पत्नी अनुजा ससाने यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी राजस्थानी मंडळाच्या अध्यक्ष साधना बाहेती, नारायणदास भट्टड, जेठमलजी बंग उपस्थित होते. प्रशिक्षित महिलांमधून ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. त्यात अनुसया पराते या महिलेला शिवणयंत्र मिळाले. पुरुषोत्तम सारडा यांच्या हस्ते त्यांना शिवणयंत्र देण्यात आले.संचालन दीपा सारडा यांनी केले. कार्यक्रमाला सारडा ट्रस्ट आणि राजस्थानी महिला महिला मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. आभार ओम सारडा यांनी मानले. समाजोपयोगी कार्यात अग्रेसर असलेल्या या ट्रस्टच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.