शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

खबरदारीअभावी जाताहेत प्रवाशांचे जीव

By admin | Updated: December 28, 2015 03:40 IST

रेल्वेगाड्यात कोचच्या दारावर उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. यामुळे तोल जाऊन खाली पडल्यामुळे अनेक प्रवाशांचा मृत्यू होत आहे.

प्रमाण वाढले : कोचच्या दारावर उभे राहून करतात प्रवासनागपूर : रेल्वेगाड्यात कोचच्या दारावर उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. यामुळे तोल जाऊन खाली पडल्यामुळे अनेक प्रवाशांचा मृत्यू होत आहे. तर असंख्य प्रवासी गंभीर जखमी होऊन त्यांना कायमचे अपंगत्व येण्याच्या घटनात वाढ झाली आहे.रेल्वेगाडीत प्रवास करताना अनेक प्रवासी मोबाईलवर बोलत बोलत कोचच्या दारावर उभे राहून प्रवास करतात. मोबाईलवर बोलण्याच्या नादात त्यांचे लक्ष नसल्यामुळे अचानक पाय घसरून त्यांचा तोल जातो. आधीच गाडी वेगात असल्यामुळे ते जोरात खाली फेकल्या जातात. यात ते गंभीर जखमी होतात. अनेक प्रवाशांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे तर काहींचा अतिरक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. रेल्वेस्थानकावर प्रवाशांना एका प्लॅटफार्मवरून दुसऱ्या प्लॅटफार्मवर जाण्यासाठी फूट ओव्हरब्रीजची सुविधा आहे. परंतु शॉर्टकटच्या नादात अनेक प्रवासी रेल्वे रुळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफार्मवर जाण्याचा प्रयत्न करतात. हा प्रयत्न अनेकदा त्यांच्या जीवावर बेततो. वेगात असलेल्या रेल्वेगाडीला एकदम ब्रेक मारणे शक्य होत नसल्याने संबंधित रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशाच्या चिंधड्या उडतात. या घटनात सातत्याने वाढ होत आहे. वारंवार अशा घटना घडूनही प्रवासी त्यापासून कुठलाच धडा घेताना दिसत नाहीत. त्यामुळे खबरदारी बाळगून आपला जीव वाचविण्यासाठी प्रवाशांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)अशी आहे दंडाची तरतूदरेल्वेगाडीच्या पायदानावर बसून प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रवाशांवर रेल्वे अ‍ॅक्ट १५६ नुसार कारवाईची तरतूद आहे. या अ‍ॅक्टनुसार एक हजार रुपये दंड किंवा सहा महिन्यांची शिक्षा किंवा दोन्ही अशी तरतूद आहे. फूटओव्हरब्रीज टाळून रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवरही रेल्वे अ‍ॅक्ट १४७ नुसार कारवाई करण्यात येते. या अ‍ॅक्टनुसार ५०० रुपये दंड किंवा सहा महिन्यांची शिक्षा किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे.सूचना, पथनाट्याद्वारे जनजागृती‘प्रवाशांनी रेल्वेगाडीच्या पायदानावर बसून प्रवास करणे तसेच रेल्वे रुळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफार्मवर जाणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारचे कृत्य प्रवाशांनी करू नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येतात. यात ध्वनिक्षेपकावरून प्रवाशांना सूचना देणे, रेल्वेस्थानकावर पथनाट्य सादर करून प्रवाशांमध्ये जनजागृती करणे आणि रेल्वेगाड्यात स्टिकर्स लावून माहिती पुरविण्याचे काम करण्यात येते.’कल्याण मोरे, निरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल