शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांच्या भेटीसाठी पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 21:51 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक बदल केले जात आहे. आता येथे रुग्ण भेटण्यासाठी अधिकृत पास घेणे आवश्यक आहे. ठराविक वेळेतच रुग्णाला भेटता येणार आहे. केवळ एका व्यक्तीला रुग्णाजवळ थांबण्याची सवलत दिली आहे.

ठळक मुद्देगैरप्रकाराला आळा : संसर्गाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक बदल केले जात आहे. आता येथे रुग्ण भेटण्यासाठी अधिकृत पास घेणे आवश्यक आहे. ठराविक वेळेतच रुग्णाला भेटता येणार आहे. केवळ एका व्यक्तीला रुग्णाजवळ थांबण्याची सवलत दिली आहे. यामुळे गैरप्रकाराला आळा बसून वॉर्डातील स्वच्छता वाढली आहे.मेडिकलमध्ये रुग्ण दाखल असला की त्याचे संपूर्ण कुटुंबच येथे मुक्कामाला येत होते. त्यामुळे रूग्णालयात सतत गर्दी असायची. भेटण्याची वेळ निश्चित नसल्याने रुग्णालाही आराम मिळत नव्हता. यावर उपाय म्हणून एका नातेवाईकाला रुग्णासोबत २४ तास राहण्याची मुभा दिली. तशी अधिकृत पास त्याला घ्यावी लागते. ही व्यक्ती कितीही वेळा वॉर्डातून आतबाहेर जाऊ शकतो. तर ठराविक वेळेत भेटण्यासाठी गुलाबी रंगाच्या दोन पास आहेत. या पासवर दुपाारी १२ ते २ आणि सायंकाळी ६.३० ते ८.३० याच वेळेत रुग्णांची भेट घेता येणार आहे. अतिदक्षात कक्षात (आयीसीसीयू) रुग्णालयात भेटण्यासाठी दुपारी ४ ते ६ ही वेळ निर्धारित केली आहे. यामुळे रुग्णांच्या भोवतालची गर्दी कमी झाली आहे. बरचेदा रुग्णांसोबतच त्याचे नातेवाईक जेवण करत होते. तिथेच झोपत होते यामुळे संसर्गाचा धोका वाढला होता. वॉर्डातील स्वच्छता धोक्यात आली होती. आता प्रत्येकाला वेळी ठरवून दिल्याने रुग्णालयीन कर्मचाऱ्यांवरचा ताण कमी असून सेवा देताना येणाऱ्या अडचणी कमी झाल्याचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी सांगितले.स्वतंत्र अपघात कक्षमेडिकलमध्ये अपघात कक्ष व बाह्यरुग्ण तपासणी विभाग एकत्र आहे. यावर एमसीआयने वारंवार आक्षेप घेतले आहे. त्यामुळे आता येथे लवकरच अद्ययावत असा अपघात कक्ष उभारण्यात येणार आहे. यासाठी रुग्णालय प्रशासानाने जागा निश्चित केली आहे. त्यामुळे बाह्यरूग्ण विभागातील गर्दी कमी होणार आहे.