शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पोलीस पाटलांचा गाव विकासात सहभाग

By admin | Updated: May 1, 2016 02:30 IST

एरवी पोलीस पाटील हे केवळ गावातील तंटे पोलीस ठाण्यापर्यंत नेवून सोडविणारा दुवा म्हणून भूमिका बजावित होते.

राळेगाव उपविभागाचा उपक्रम : कार्यक्षेत्र विस्तारणार, गावातील महसूली कामावरही लक्षराळेगाव : एरवी पोलीस पाटील हे केवळ गावातील तंटे पोलीस ठाण्यापर्यंत नेवून सोडविणारा दुवा म्हणून भूमिका बजावित होते. त्यांचे कार्यक्षेत्र पोलीस ठाण्यापर्यंत मर्यादित होते. परंतु आता राळेगाव उपविभागात वेगळा उपक्रम राबवून पोलीस पाटलांचा गाव विकासात सक्रिय सहभाग घेण्यात येणार आहे. राळेगाव उपविभागात येणाऱ्या क्षेत्रातील सर्व पोलीस पाटलांची सभा घेण्यात आली. आपल्या गावातील प्रत्येक बाबीचा अभ्यास करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहे. महसूल विभागाशी संबंधित प्रकरणे यात गावाची लोकसंख्या, गावातील व्यसनाधीन लोकांवर नजर ठेवणे, गावात जुगार चालतो काय, अवैध व्यवसाय आहे काय, गावात येणाऱ्या मुसाफिर लोकांच्या नोंदी, १८ वर्षाखालील मुलींचे लग्न होतात काय, स्वस्त धान्य दुकानातील धान्य वाटपावर लक्ष ठेवणे, दक्षता समितीची बैठक, गावात शेतकरी आत्महत्या होऊ नये याकडे लक्ष पुरविणे, बळीराजा चेतना अभियानात आलेल्या एक लाख रुपयांच्या निधीचा उपयोग कसा झाला, इतर अनुदानाचे नियोजन योग्य प्रकारे होत आहे काय, गावाच्या शेजारी तलाव-बंधारे-सिमेंट नाले यांची स्थिती काय आहे, रेती-मुरूम-माती-गोटे आदींचे अवैध उत्खनन होते काय याबाबत लक्ष पुरवून वेळोवेळी तहसील कार्यालयास माहिती देणे आदी अधिकार पोलीस पाटलांना देण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी संजय अपार यांनी पोलीस पाटील हा गावातील प्रत्येक गोष्टीशी निगडीत असतो. त्याला योग्य प्रशिक्षण दिले तर गाव विकासाच्या अनेक योजना आखताना मदत घेता येऊ शकते. या कल्पनेतून त्यांनी नवीन उपक्रम सुरू केला आहे. पोलीस पाटील पदे गावातील विकासाचे नवे दुवे ठरणार असून, त्यांना महसूल विभागाच्या कामात लक्ष पुरविण्याचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक घटकावर व त्यांच्या समस्येवर उपाययोजना पोलीस पाटलांना करता येणार आहे. याकरिता उपविभागीय अधिकारी संजय अपार यांनी पोलीस पाटलांकडून एक प्रश्नावलीदेखील सोडवून घेतली आहे. प्रशासनाने अलीकडेच परीक्षेच्या माध्यमातून पोलीस पाटील पदाची भरती करण्यात आली. यातून उच्च शिक्षित तरुणही निवडले गेले. त्यामुळे गाव विकासात त्यांचा हातभार लागणार आहे. (प्रतिनिधी)