शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

परसोडी गावात कोंबडीशिवाय पिलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 21:48 IST

कोंबडी अंड्यावर बसविल्याशिवाय पिलं तयारच होत नाही, असच कुणी सांगेल. कोंबडीशिवाय पिलं तयार झाली म्हटले तर हसतील. मात्र आजच्या कल्पकतेच्या युगात हे सर्व घडत आहे. किचकट, दीर्घ कालावधीच्या आणि अडकून पडण्याच्या पध्दती बाद होत चालल्या आहे.

ठळक मुद्देकल्पकतेची किमया : पृष्ठाचा डबा व लाईटचा वापर, कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : कोंबडी अंड्यावर बसविल्याशिवाय पिलं तयारच होत नाही, असच कुणी सांगेल. कोंबडीशिवाय पिलं तयार झाली म्हटले तर हसतील. मात्र आजच्या कल्पकतेच्या युगात हे सर्व घडत आहे. किचकट, दीर्घ कालावधीच्या आणि अडकून पडण्याच्या पध्दती बाद होत चालल्या आहे. परसोडी (ता.कळंब) गावातील युवकांनी हीच कास धरत कोंबडीशिवाय पिलं तयार करण्याची किमया साधली आहे.परसोडी (बु.) येथील ऋषीकेश दीपक ढोले व त्याचे काका प्रशांत अंकुश ढोले यांनी कोंबडी अंड्यावर न बसविता पिल्ले तयार करणारे यंत्र विकसित केले. यासाठी त्यांना केवळ ७०० रुपये खर्च आला आहे. परसोडी (बु.) येथील सरपंच आणि प्रगतशील शेतकरी आनंदराव जगताप यांनी गावराण कोंबड्या पाळल्या आहे. त्यांच्याकडील दोन कोंबड्या अंड्यावर बसत नव्हत्या. याची माहिती कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला ऋषीकेश दीपक ढोेले आणि प्रशांत अंकुश ढोले यांना देण्यात आली. ऋषीकेशने यापूर्वी शेतीत अनेक यशस्वी प्रयोग केलेले आहे. कोंबडीशिवाय पिलाचा प्रयोग यशस्वी करण्याचा चंग त्याने बांधला. यात तो यशस्वीसुध्दा झाला. यासाठी अनेक पुस्तके चाळली.अंडी उबविण्यासाठी ३७ ते ३८ डिग्री तापमान व ७० ते ८० टक्के आर्द्रतेची गरज असते, अशी माहिती त्यांना मिळाली. सर्वप्रथम त्यांनी ४० अंडी मावतील इतका पृष्ठाचा डबा आतून थर्माकोल लाऊन तयार केला. डब्यात ३८ अंडी ठेवली. ६० पॉवरचा लाईट लावला. ३८ डिग्री तापमान होताच लाईट आपोआप बंद होईल, अशी यंत्रणा (सेंसर) विकसित केली. आर्द्रतेसाठी बल्बखाली पाणी ठेवले. बल्बच्या तापमानाने पाण्याची वाफ होऊन डब्यात आर्द्रता मिळविण्यात आली. कालांतराने अंडी फिरविण्यात आली. डब्यात ठेवलेल्या ३८ अंड्यापैकी २१ दिवसानंतर ३५ अंड्यातून पिल्ले बाहेर आली. कोंबडी अंडी उबविते तेव्हा पूर्ण अंड्यातून पिल्ले बाहेर येत नाही. कृत्रिम प्रयोगाचा सक्सेस रेट यापेक्षा अधिक आहे.घरीच करता येणारा प्रयोगकोणालाही घरच्याघरी करता येण्यासारखा हा प्रयोग आहे. याचे अनेक फायदे आहेत. कोंबडीला २१ दिवस अंड्यावर बसण्याची आणि पिलांना सांभाळण्याची गरज नाही. कोंबडी पुन्हा लवकरच अंडी द्यायला तयार होते. या प्रयोगाच्या यशांनतर ऋषीकेशने एकाच वेळी ३०० अंडी बसतील, असे यंत्र विकसित केले आहे. यापूर्वी त्याने फवारणी यंत्र व खत पेरणी यंत्र तयार केलेले आहे.