शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

पारवा परिसरात तापाची साथ

By admin | Updated: September 15, 2014 00:25 IST

वातावरणातील बदल आणि जागोजागी पसरलेली घाण या कारणांमुळे पारवा परिसराला आजाराने ग्रासले आहे. घराघरांमध्ये तापाचे रुग्ण आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालये फुल्ल झाली आहेत.

पारवा : वातावरणातील बदल आणि जागोजागी पसरलेली घाण या कारणांमुळे पारवा परिसराला आजाराने ग्रासले आहे. घराघरांमध्ये तापाचे रुग्ण आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालये फुल्ल झाली आहेत. दररोज विविध रुग्णालयांमध्ये सुमारे ५०० ते ६०० लोकांवर उपचार सुरू आहे. जिल्हा आरोग्य विभागाने ही साथ नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहले. काही भागात पाणी शिरल्यामुळे जागोजागी मोठमोठे डबके तयार झाले आहे. याशिवाय गावातील खतांचे ढिगारे, तुंबलेल्या नाल्या, गावाशेजारीच असलेली हागणदारी आदी कारणांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला. दुर्गंधी वाढली. पिण्याचे पाणी अशुद्ध झाले. या व इतर कारणांमुळे तापासह इतर आजारांनी तोंड वर काढले. पारव्यासह परिसरातील प्रत्येक गावात घराघरांमध्ये तीन ते चार रुग्ण आढळून येत आहे. काही ठिकाणी तर कुटुंबातील सर्व सदस्यांना तापाची लागण झाली आहे. खासगी रुग्णालयात दररोज १०० ते २०० तर प्राथमिक आरोग्य केंद्रात ३०० च्या जवळपास रुग्णांची नोंदणी होत आहे. तीन ते चार दिवसपर्यंत ताप उतरत नसल्याने नागरिकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. मोकळ्या जागेतील वाढलेले गाजरगवत याशिवाय इतर निरूपयोगी झाडे या आजाराला वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. ग्रामपंचायतींकडून पावसाळ्यापूर्वी कुठलीही खबरदारी घेतली जात नाही. परिणामी नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. यातील सर्वात मोठा प्रश्न आरोग्याचा आहे. तुंबलेल्या नाल्या साफ करण्याचे सौजन्य ग्रामपंचायती दाखवित नाही. पावसाचे पाणी वाट मिळेल तिकडे वाहून जाते. या प्रकारात जलस्रोतही दूषित होतात. विहीर किंवा हातपंपाचे पाणी शुद्ध करण्यासाठी ग्रामपंचायतींजवळ ब्लिचिंग पावडरशिवाय दुसरा उपाय नाही. हा उपाय अतिशय तकलादू आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून हालचाली केल्या जात नाही. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि सदस्यही या विषयासंदर्भात गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी नागरिकांना मात्र तापासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)