शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा ठाणेदारांची उचलबांगडी

By admin | Updated: June 5, 2014 00:02 IST

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्डयावर धाड घालून चार जुगार्‍यांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून जुगार साहित्यासह ८८ हजार ९५0

यवतमाळ : जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्डयावर धाड घालून चार जुगार्‍यांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून जुगार साहित्यासह ८८ हजार ९५0 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी तडकाफडकी पांढरकवडाचे ठाणेदार अशोक बागूल यांची उचलबांगडी केली. तसेच त्यांना नियंत्रण कक्षात बसविण्यात आले.शुभम अशोक राय रा. पांढरकवडा असे अटकेतील जुगार अड्डाचालकाचे तर शेख नासीर राज मोहम्मद, राज पोशदू नालमवार आणि अनिकेत बलवंतराव भोंगाडे तीघेही रा. पाटणबोरी अशी अटकेतील जुगार्‍यांची नावे आहे. पाटणबोरी येथे मोठा जुगारअड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या फौजदार आर. डी. वटाणे यांच्या नेतृत्वातील पथकाला मिळाली. त्यांनी पथकासह पाटणबोरी गाठून जुगार अड्डयावर धाड घातली. तसेच घटनास्थळाहून डावातील आणि जुगार्‍यांच्या झडतीत आढळलेली ७५ हजार ९५0 रूपये व चार मोबाईल असा एकूण ८८ हजार ९५0 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.  सुरूवातीपासूनच जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची भूमिका अवैध दारू विक्री आणि जुगाराविरोधात राहीली आहे.  प्रत्येक क्राईम मिटींगमध्ये ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे नियंत्रित करा, अन्यथा कारवाईला सामारे जा असा ईशारा त्यांच्याकडून ठाणेदारांना देण्यात येतो. मात्र पोलीस अधीक्षक शर्मा यांच्या या आदेशाकडे फारसे गांर्भीयाने न पहाता. ठाणेदार बागूल यांनी अवैध धंदे सुरूच ठेवले होते. यासंदर्भात पोलीस अधीक्षक स्तरावरच नव्हे तर अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांच्याकडेही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यापूर्वी जिल्हा महानिरीक्षक बिहारी जिल्हा दौर्‍यावर आले असताना ठाणेदार बागूल यांना बोलावून महानिरीक्षक बिहारी यांनी त्यांची अवैध धंदे नियंत्रित करण्यासाठी कानउघाडणी करीत समजही दिली होती. त्यातच या कारवाईची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक शर्मा यांनी ठाणेदार बागुल यांना मेमो दिला. तसेच तडकाफडकी उचलबांगडी करून येथील नियंत्रित कक्षात बसविले. (स्थानिक प्रतिनिधी)