शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

पांगरीचे पोलीस पाटील अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:10 IST

भरधाव मेटॅडोअरने समोरून येणाºया कारला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात तालुक्यातील पांगरी येथील पोलीस पाटील जागीच ठार झाले.

ठळक मुद्देमांगुळजवळची घटना : मेटाडोअरची कारला धडक

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : भरधाव मेटॅडोअरने समोरून येणाºया कारला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात तालुक्यातील पांगरी येथील पोलीस पाटील जागीच ठार झाले. ही घटना यवतमाळ-आर्णी मार्गावरील मांगुळ गावाजवळ शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की मेटॅडोअरची लोखंडी पट्टी गळ्यातून आरपार गेल्याने पोलीस पाटलांचा मृत्यू झाला.अमोल भाऊराव शिंदे (३६) असे मृत पोलीस पाटलाचे नाव आहे. ते यवतमाळवरून शनिवारी रात्री आर्णीकडे येत होते. त्यावेळी मांगुळ गावाजवळ समोरून येणाºया मेटॅडोअरने (क्र.एम.एच.१८/एफ-१६८५) जबर धडक दिली. कारच्या चालकाच्या बाजूने धडक लागली. त्यातच मेटॅडोअरची लोखंडी पट्टी अमोलच्या गळ्यातून आरपार गेली. तसेच त्यांचा डावा हातही तुटला. यातच त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, अपघातानंतर भरधाव मेटॅडोअरही रस्त्याच्या कडेला जावून उलटला. अमोल हा मित्रमंडळामध्ये मीतभाषी असल्याने लोकप्रिय होता. तो सोशल मीडियावरही अ‍ॅक्टीव्ह राहात होता. शनिवारी त्याच्या पत्नीचा वाढदिवस होता. त्यानिमित्त त्याने टाकलेली फेसबुकवरील पोस्ट शेवटची ठरली. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आहे. या अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.