शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

एकोपा जपणारा पाच पांडवांचा पांडे परिवार

By admin | Updated: May 15, 2016 01:57 IST

चारचौघांनी एकोप्याने राहणे, ही गोष्ट आता दुर्मिळ होत चालली आहे. पती-पत्नीतील विसंवादाची उदाहरणे वाढत आहे.

अविनाश साबापुरे/रूपेश उत्तरवार यवतमाळचारचौघांनी एकोप्याने राहणे, ही गोष्ट आता दुर्मिळ होत चालली आहे. पती-पत्नीतील विसंवादाची उदाहरणे वाढत आहे. भावा-भावांतील यादवी तर आता समाजाच्या अंगवळणीच पडू लागली आहे. त्यामुळे विभक्त कुटुंबांचे पीक जोमात आहे. अशावेळी यवतमाळातील एका कुटुंबात मात्र तब्बल २४ सदस्य अगदी गुण्यागोविंदाने राहत आहेत. रविवारी साजऱ्या होत असलेल्या कुटुंब दिनानिमित्त या कुटुंबाच्या एकोप्यावर एक नजर...कौटुुंबिक सौहार्द जपणारे हे पांडे कुटुंब आर्णी रोड परिसरात राहते. एकमेकांना समजून वागणारे पाच भाऊ जणू पाच पांडवच. त्यांच्या पत्नी, मुले, सुना, वृद्ध आई असा २४ जणांचा हा कुटुंबकबिला दररोज एकत्र बसून जेवण करतो. कधी-कधी चक्क खुल्या अंगणात आकाशाच्या छताखाली त्यांची डबापार्टीही रंगते. मूळ आमला (ता. कळंब) हे त्यांचे गाव. अजाबराव पांडे आणि सुमन पांडे या दाम्पत्याने मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून यवतमाळात ६० वर्षांपूर्वी घर घेतले. पुढे अख्खे कुटुंबच यवतमाळात स्थायिक झाले. मात्र, आमला गावातील ८० एकर शेती ते आजही तेवढ्याच निष्ठेने पाहतात. अजाबराव यांच्या संस्कारामुळेच त्यांची पाचही मुले आज पन्नाशीच्या पलीकडे पोहोचूनही एकत्र राहतात. अविनाश, अनिल, अभय, अतुल आणि सुधीर ही अजाबराव पांडे यांची पाचही मुले अगदी गुण्यागोविंदाने एकाच छताखाली राहतात. गेल्या ६० वर्षांपासून ते एकाच घरात आहेत. पाचही भावांच्या पत्नी शिक्षित आहे. सुनाही कुटुंबात एकोप्याने राहतात. अजाबराव पांडे यांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांची अविनाश, अनिल, अभय, अतुल, सुधीर ही पाचही मुले आपापल्या स्वतंत्र व्यवसायात व्यग्र आहेत. अविनाश यांचे सर्विसिंग सेंटर आणि वर्कशॉप आहे. अनिल पांडे हे माजी नगरसेवक आणि प्रसिद्ध कुस्तीगीरही आहेत. तेही वर्कशॉप चालवितात. अभय पांडे आमला येथील ८० एकर शेती सांभाळतात. अतुल पांडे कळंब येथील महाविद्यालयात प्राचार्य आहेत. तर सुधीर पांडे बीई झाले असून स्वत:चा व्यवसाय करतात. या घरातील सुनाही समंजस आहेत. शिकलेल्या मुली सासूशी निट वागत नाही, अशी ओरड नेहमी केली जाते. मात्र, शोभा अविनाश पांडे, कुसूम अनिल पांडे, सविता अभय पांडे, मीनाक्षी अतुल पांडे, सोनाली सुधीर पांडे या पाचही सुना आपल्या ८४ वर्षांच्या सासू सुमन पांडे यांची अथक सेवासुश्रूषा करीत आहेत. अमूक काम मीच का करावे, अशी तक्रार त्यांच्या तोंडी कधीच नसते. पाच भावांच्या उत्पन्नाची साधने वेगवेगळी असली तरी घराचा खर्च सारे मिळूनच भागवितात. घरातील सण समारंभ एकत्रित केला जातो. गणेशोत्सवात तर या घरात झगमग असते. सासरी गेलेल्या दोन बहिणी विजया दिवाकर भोयर आणि जयश्री सुनील झाडे याही माहेरी येतात. घरातील कुणाचाही वाढदिवस, कुणाच्या लग्नाचा वाढदिवस या २४ जणांच्या कुटुंबात एखाद्या सणासारखा साजरा होतो. पाच भावांच्या या कुटुंबात नातवंडेही दहा आहेत. विरेंद्र, रवींद्र, पवन, पंकज, सुप्रिया, हर्षल, गौरव, सलोनी, स्वरूप, सानिका आणि (पणती) चारू अशा भरल्या गोकुळात आजी सुमनबाई रमून जातात. मंगला विरेंद्र पांडे आणि दिव्या पवन पांडे या दोन नातसुनाही या घरातील एकोप्याशी एकरूप झाल्या आहेत.एकत्र कुटुंबाचे फायदेपाच भावांचे २४ जणांचे कुटुंब एकत्र नांदताना बरेच फायदे होतात, असे अनिल पांडे म्हणाले. घरातील कुणाला अचानक बाहेरगावी जावे लागले तर त्याला घरातील मुलाबाळांची काळजी नसते. कारण इतर भाऊ असतातच. एखादा भाऊ अडचणीत असला तर इतर चौघांची मदत मिळते. विशेष म्हणजे, समाजाकडूनही या कुटुंबाकडे आदराने पाहिले जाते. पाच भावांची एकजूट असल्याने वेगळाच सन्मान मिळतो. २४ जणांचे हे कुटुंब सहलीला जाते तेव्हा तर आनंदाला उधाणच येते. अलीकडेच पांडे परिवार महाराष्ट्र दर्शन करून आला. शिवाय, अख्खा परिवार एखाद्या दिवशी शेतात जातो, तेव्हा आमला गावही हरखून जाते.एका छताखाली सात समंजस सुनांचा संसारपांडे परिवारात पाच सुना आणि दोन नात सुना आहेत. साऱ्याच शिक्षित आहेत. तरी २४ जणांचा दररोजचा स्वयंपाक करण्यासाठी त्यांनी मोलकरीण ठेवलेली नाही. त्या स्वत:च मिळून-मिसळून २४ जणांचा स्वयंपाक करतात. विशेष म्हणजे, पाचही सुनांचे एकच ‘किचन’ आहे. २४ जण एकत्र बसून जेवतात. त्यामुळेच पांडे कुटुंबात रोजच एखाद्या समारंभासारखे वातावरण असते. वर्षाला लागणारे १२ क्विंटल गहू, तांदूळ पाचही सुना मिळून निसून वाळवून निट ठेवतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकमेकींशी हसत-बोलत त्यांची दिनचर्या सुरू असते. त्यात ८४ वर्षांच्या वयोवृद्ध सासूची सेवाही सुरू असते. आजच्या विसंवादी वातावरणात दोन महिला एकत्र नांदणे कठीण झाले आहे, मात्र, पांडे कुटुंबात तब्बल सात सुनांचा संसार एका छताखाली अगदी गुण्यागोविंदाने सुरू आहे !एकोप्याचे गुपितपांडे कुटुंबातील पाचही भावांचा एकमेकांशी नित्य संवाद असतो. कोणताही प्रसंग असो, ते एकमेकांचा विचार घेऊनच पुढे पाऊल टाकतात. त्यामुळे यश येतेच; आणि अपयश आले तरी निराशा येत नाही. एकमेकांना समजून घेण्याची हातोटी त्यांना साधली आहे. कुणाचे उत्पन्न कमी, कुणाचे जास्त या हिशेबात ते पडत नाही. उलट ज्याला जेव्हा मदत लागली, तेव्हा सारे मिळून मदत करतात. विशेष म्हणजे, या घराला लाभलेल्या सुनाही अशाच समंजस आहेत.