शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा तालुक्यात ९० हजार ८४४ मतदार

By admin | Updated: February 5, 2017 00:58 IST

येत्या १६ फेब्रूवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीकरीता तालुक्यातील चार जिल्हा परिषद

जि.प.-पं.स.निवडणुक : चार गटांसाठी २४, तर आठ गणांसाठी ५३ उमेदवारी अर्ज नरेश मानकर पांढरकवडा येत्या १६ फेब्रूवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीकरीता तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटात एकुण ९० हजार ८४४ मतदारांची नोंदणी झाली आहे. मागील निवडणुकीपेक्षा जवळपास १० हजार मतदार वाढले आहेत. मागील निवडणुकीत मोहदा, पहापळ, पाटणबोरी हे तीनच जिल्हा परिषदेचे गट होते. यावेळी मात्र खैरगाव (बु.) या नवीन गटाची निर्मिती करण्यात करण्यात आली असून आता तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार गट अस्तित्वात आले आहे. या चारही गटातून एकुण २४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. २०१२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आघाडी व युती फिसकटल्यामुळे निवडणुका स्वबळावर लढविण्यात आल्या होत्या. यावेळीसुध्दा हीच परिस्थिती असून काँग्रेस, भाजप, सेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे स्वबळावर निवडणूक लढवित आहे. काँग्रेस, भाजपा, शिवसेना या पक्षाने चारही गटातून आपले उमेदवार उभे केले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने तीनच गटात आपले उमेदवार उभे केले आहे. खैरगाव (बु.) या गटात या पक्षाचा उमेदवारच नाही. पाटणबोरी हा जिल्हा परिषदेचा एकमेव गट सर्वसाधारण आहे. या गटातून सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. या गटात २२ हजार ५२१ मतदार आहेत. पहापळ हा जिल्हा परिषदेचा गट सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव असून या गटातून पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. या महिला उमेदवारासाठी राखीव असलेल्या या गटात २० हजार ८०४ मतदार आहेत. मोहदा हा जिल्हा परिषदेचा गट नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असून या गटातून आठ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. या २३ हजार ४३९ मतदार आहेत. यावेळी नव्याने तयार झालेला खैरगाव (बु.) हा जिल्हा परिषद गट नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला उमेदवारासाठी राखीव असून या गटातून पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी आपले नामांकन दाखल केले आहे.