शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समिती सभापतीच्या राजकीय घडामोडींना वेग

By admin | Updated: August 31, 2014 00:06 IST

पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडणुकीची पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. १४ सप्टेंबर ही तारीख निश्चित झाल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा

सुरेंद्र राऊत - यवतमाळ पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडणुकीची पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. १४ सप्टेंबर ही तारीख निश्चित झाल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रभाव यावर दिसत आहे. नेतेमंडळी विधानसभेसाठी सोईस्कर ठरेल अशाच पध्दतीने राजकीय समिकरण जुळविण्याच्या हालचाली करत आहे. या निवडप्रक्रियेत स्थानिक आमदारांकडून पाच वर्षे विरोधात असलेल्या गटाला आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न सुरू आहे. प्रसंगी स्वपक्षातीलच दावेदार निष्ठावंताला पदापासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहे. काही पंचायत समितीमध्ये काँग्रेसला राष्ट्रवादीसोबत, काही ठिकाणी राष्ट्रवादीला काँग्रेससोबत बसण्याशिवाय गत्यंतर नाही. अशा स्थितीत स्वपक्षातील इच्छुकांची गच्छंती करून दुसऱ्या पक्षातील गटाला संधी देण्याचे औदार्य दाखविले जाण्याची शक्यता आहे. घाटंजी, यवतमाळ, वणी येथे सभापतीपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. घाटंजीमध्ये काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत आहे. ना.शिवाजीराव मोघे आणि त्यांच्या विरोधातील काँग्रेसचा गट यांच्यात स्पर्धा आहे. यवतमाळात १४ पैकी सहाच सदस्य काँग्रेसचे, पाच राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन, मनसे एक सदस्य आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी-शिवसेनेने आघाडी करून सत्ता स्थापन केली. विधानसभा निवडणूक असल्याने येथे विरोधातील काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता कमी आहे. ऐन वेळेवर कोणता पक्ष संख्याबळ जुळविण्यात यशस्वी होतो, यावरच सभापतीपदाचे गणित आहे. वणीमध्ये शिवसेनेकडे चार सदस्य आहे. काँग्रेस, भाजप, मनसे, बसपा यांच्याकडे प्रत्येकी एक सदस्य आहे. येथे पुन्हा शिवसेनेची सत्ता स्थापन होण्याची चिन्हे आहे. महागाव, आर्णी, बाभूळगाव, कळंब येथे सर्वसाधारण महिला आरक्षण आहे. महागावमध्ये राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत आहे. अशीच स्थिती आर्णीत असून येथे काँग्रेस स्पष्ट बहुमतात आहे. बाभूळगावमध्ये काँग्रेसचे तीन सदस्य, भाजप दोन आणि राष्ट्रवादी एक अशी स्थिती आहे.