शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
3
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
4
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
5
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
6
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
7
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
8
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
9
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
10
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
11
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
12
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
13
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
14
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
15
सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
16
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
17
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
18
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
19
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
20
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते

ऑक्सिजन साेडा, साधा जनरेटरही नाही, काेविड केअर सेंटरमध्ये रुग्ण घामाघूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 05:00 IST

काेविड केअर सेंटर व डेडिकेटेड काेविड हेल्थ सेंटरमध्ये मूलभूत सुविधांचा वाणवा आहे़  या ठिकाणी इनर्व्हटर देण्यात यावे असा प्रस्ताव तालुका आराेग्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे़  याला अजूनपर्यंत मान्यता मिळली नाही़  त्यामुळे डाॅक्टर, आराेग्य कर्मचारी व रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. काेणत्याही रुग्णाला उपचारा व औषधाइतकेच तेथील वातावरण महत्त्वाचे ठरते.

ठळक मुद्देउन्हाचा पारा ४० अंशावर : शासकीय काेविड रुग्णालयातही केवळ पंख्याची हवा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील सर्वच तालुका मुख्यालयी काेविड केअर सेंटर उघडण्यात आले आहेत़  त्या ठिकाणी साैम्य लक्षणे असलेल्या काेराेना रुग्णांना ठेवण्यात येत आहे़  तर डेडीकेटेड काेविड हेल्थ सेंटरवर मध्यम लक्षणे असलेले रुग्ण आहेत़  शासकीय काेविड रुग्णालयात गंभीर रुग्णांना ठेवले आहे़ या रुग्णांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे़ येथे वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर काेणतीच पर्यायी व्यवस्था नाही़  त्यामुळे रुग्णांना प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे़  काेविड केअर सेंटर व डेडिकेटेड काेविड हेल्थ सेंटरमध्ये मूलभूत सुविधांचा वाणवा आहे़  या ठिकाणी इनर्व्हटर देण्यात यावे असा प्रस्ताव तालुका आराेग्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे़  याला अजूनपर्यंत मान्यता मिळली नाही़  त्यामुळे डाॅक्टर, आराेग्य कर्मचारी व रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. काेणत्याही रुग्णाला उपचारा व औषधाइतकेच तेथील वातावरण महत्त्वाचे ठरते. असह्य वातावरणात उपचार केले जात असले तर रुग्णावर त्याचा मानसिक आघात हाेतो. काेणत्याही सामान्य माणसाला काेविड सेंटरमध्ये पाच मिनिट थांबता येत नाही अशी स्थिती आहे. उकाडा वाढत असल्याने रुग्णांची हाल  हाेत आहे.

एप्रिल तापला- गेल्या चार दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत आहे.  तापमान ४२ अंशावर पाेहाेचले आहे.   - मार्चमध्ये उन्हाचा पारा हा ३९ अंशावर आतमध्ये हाेता. त्यात आणखी वाढ हाेण्याची शक्यता आहे. - काेराेना रुग्णांना श्वास घेण्यास त्रास हाेताे़  त्यात गरमीमुळे स्थिती असह्य हाेत आहे.

काेराेनापेक्षा उकाडा जीवघेणा 

- काेराेना  आजारापेक्षा काेविड केअर सेंटरवर उकाडा असह्य हाेत आहे़ येथे काेणतीच सुविधा नाही. एकवेळ औषध मिळाले नाही तरी चालेल; पण उकाड्यामुळे जीव नकाेसा झाला आहे़ येथे रुग्णांना गरमीपासून आराम मिळेल, अशी व्यवस्था तत्काळ करावी किंवा घरी राहून तरी उपचार दिला जावा़ - एक रुग्ण 

- काेराेनाचे दुखणे कायम असताना आता गरमी जीवावर उठली आहे. येथे जनरेटर, इनर्व्हटरची काेणतीच सुविधा नाही. दिवस काढणे कठीण झाले आहे़ वीज पुरवठा काही तास खंडित झाला स्थिती अतिशय भयंकर हाेते़  प्रचंड गरमीमुळे येथे थांबावे वाटत नाही़ उलट अशा वातावरणामुळे आणखी प्रकृती बिघडण्याचा धाेका निर्माण झाला आहे़ - एक रुग्ण

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या