शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तोतया मालक उभा करून शेत विक्री

By admin | Updated: June 16, 2017 01:44 IST

बनावट कागदपत्रे तयार करून, मूळ मालकाऐवजी तोतया मालक उभा करून मारेगाव तालुक्यातील घोगुलदरा येथील

घोगुलदरा येथील घटना : पिडित शेतकऱ्याची मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रारलोकमत न्यूज नेटवर्कवणी : बनावट कागदपत्रे तयार करून, मूळ मालकाऐवजी तोतया मालक उभा करून मारेगाव तालुक्यातील घोगुलदरा येथील एका शेताची खरेदी करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून याप्रकरणी पिडित शेतकऱ्याने मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चंद्रपूर येथील विनित प्रभाकर नगराळे याने मारेगावच्या दुय्यम निबंधकांना हाताशी धरून बनावट कागदपत्राच्या आधारे सदर शेतीचे खरेदीखत तयार केले. याकामी मारेगाव येथील विजय ढाकणे व प्रदीप देवाळकर यांनीही विनीत नगराळे याला मदत केल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. नंदकिशोर तुकाराम नेहारे असे तक्रारकर्त्या शेतकऱ्याचे नाव असून तो पांढरकवडा तालुक्यातील चालबर्डी येथील रहिवासी आहे. मारेगाव तालुक्यातील घोगुलदरा येथे नंदकिशोर नेहारे याच्या मालकीची शेती (गट क्रमांक ७४/२) आहे. नेहारे याने ही शेती विश्वनाथ मोहितकर यांच्याकडून दोन वर्षांपूर्वी खरेदी केली होती. मात्र चंद्रपूर येथील सिस्टर कॉलनी परिसरात राहणाऱ्या विनित नगराळे याने १८ मे रोजी मारेगावचे दुय्यम निबंधक धनंजय लाड यांच्याशी संगनमत करून विजय ढाकणे व प्रदीप देवाळकर यांच्या मदतीने सदर शेताची खरेदी केली, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. शेतीचे खरेदीखत करताना नंदकिशोर तुकाराम नेहारे या मूळ मालकाऐवजी दुसऱ्याच इसमाला मालक म्हणून उभे करण्यात आले. नेहारे यांचे मतदान कार्डाच्या झेरॉक्सची चोरी करून अथवा गैैरमार्गाने ते मिळवून त्यावरील फोटोशीही छेडछाड करण्यात आली आहे. मतदान कार्डावरील नेहारे यांच्या फोटोऐवजी दुसऱ्याच इसमाचा फोटो त्यावर लावण्यात आला आहे. विनित नगराळे याने जोडलेला सातबारा हा देखील बनावट आहे. त्यावर गट क्रमांक अस्पष्ट आहे. याच सातबाराच्या खाते क्रमांक १७९ वरून शोध घेतला असता, सदर सातबारा गट क्रमांक २१४ चा आहे व गाव नमुना आठ-अ प्रमाणे या शेताचा मालक वसंत गणू हजारे आहे. यावरून विनित नगराळे याने सदर प्रकरणात जोडलेला स्वत:च्या नावाचा सातबारा बनावटी असल्याची शंका नंदकिशोर नेहारे यांनी तक्रारीतून व्यक्त केली आहे. या प्रकरणात नगराळे याने स्वत:च्या बँक खात्याचा पाच लाख रुपयांचा धनादेश नंदकिशोर नेहारे याच्या नावाने तयार करून तो खरेदीखतासोबत जोडला आहे. हा चेक माझ्या नावाने तयार करून या प्रकरणात माझ्या नावाचा गैैरवापर केल्याचाही आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. या प्रकरणात नंदकिशोर नेहारे याला आठ लाख ५० हजार रुपये दिल्याचा उल्लेख आहे. परंतु विनित नगराळे याच्यासोबत माझा शेतीसंबंधी कोणत्याही प्रकारचा व्यवहार झाला नाही किंवा कोणतीही रक्कम मला मिळाली नसल्याचा दावा नंदकिशोर नेहारे याने केला आहे. या प्रकरणी सखोल चौैकशी करून विनित नगराळे, मारेगावचे दुय्यम निबंधक धनंजय लाड, विजय ढाकणे, प्रदीप देवाळकर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा व माझी शेती मला परत मिळवून द्यावी, अशी मागणी नेहारे याने केली आहे. अवैध सावकारांचा शेतजमिनीवर डोळागरजवंत शेतकऱ्यांना हेरून एकाचवेळी त्याला मोठी रक्कम द्यायची, सुरक्षा म्हणून त्याच्या शेताची खरेदी स्वत:च्या नावे करून घ्यायची, असा गोरखधंदा करणारे अनेक अवैैध सावकार वणी उपविभागात सक्रीय झाले असून या सावकारांकडून शेतकऱ्यांची अक्षरश: लूट सुरू आहे. निसर्गाच्या बदलत्या चक्रात शेती व्यवसाय धोक्यात आला असून अनेक शेतकरी गरजेपोटी आपल्या शेती सावकराच्या ताब्यात देत आहेत. असे प्रकार मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर घडत असून प्रशासनाने ही बाब गांभिर्याने घेऊन या सावकरांवर आळा घालावा, अशी मागणी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी केली आहे.