शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरबर्डन मॅनेजमेंटचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 20:54 IST

कोळसा उत्खणनानंतर खाणीतून निघणाºया मातीचे योग्य व काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याच्या सूचना पर्यावरण मंत्रालय व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वेकोलिला मिळाल्या असल्या तरी .....

ठळक मुद्देवणी वेकोलि क्षेत्र : मातीचे ढिगारे शेतकºयांच्या मुळावर, मंत्र्यांकडून समस्या दुर्लक्षित

संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : कोळसा उत्खणनानंतर खाणीतून निघणाºया मातीचे योग्य व काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याच्या सूचना पर्यावरण मंत्रालय व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वेकोलिला मिळाल्या असल्या तरी वेकोलिकडून मात्र या नियमांचे कोणतेच पालन केले जात नसल्याने वेकोलिने उभे केलेले नियमबाह्यमातीचे ढिगारे शेतकºयांच्या मुळावर उठले आहेत. या ढिगाºयांमुळे वेकोलि बाधित क्षेत्रातील शेतीच्या उत्पादनाला मोठा फटका बसत आहे.या ढिगाºयांमुळे शेतकरी अनेक समस्यांना तोंड देत असले तरी प्रकल्पग्रस्तांच्या, खाण बाधितांच्या वेदनेशी नातं सांगणाºया केंद्रातील ‘वजन’दार मंत्र्यांकडूनही ही समस्या दुर्लक्षित केली जात असल्याने या भागातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. विशेषत: कोळसा खाण क्षेत्रातील शेतकºयांना प्रदूषणासह मातीच्या ढिगाºयांमुळे निर्माण झालेल्या समस्यांशी झुंजावे लागत आहे.वणी तालुक्यात १२ कोळसा खाणी आहेत. त्यांपैैकी दोन भूमिगत तर १० खुल्या कोळसा खाणी आहेत. यातील घोन्सा येथील कोळसा खाण निविदा न काढल्यामुळे सध्या बंद अवस्थेत आहे, तर राजूर व पिंपळगाव या दोन खाणी भूगर्भातील कोळसा संपुष्टात आल्याचे कारण देऊन बंद करण्यात आल्या आहेत. सध्या ९ कोळसा खाणींमधून कोळशाचे उत्पादन केले जात आहेत.खाणीतून निघालेल्या मातीचे ढिगारे उभे करताना अनेक नियम आहेत. बेंचेस पद्धतीने ढिगारे उभे करून त्यावर वृक्षारोपण करणे हा महत्वाचा नियम आहे. ढिगारा जर नैैसर्गिक जलस्त्रोता शेजारी असेल तर ढिगाºयावरून वाहणारे पावसाचे पाणी किंवा चिखल त्या जलप्रवाहात जाऊ नये, यासाठी ढिगाºयाभोवती संरक्षक भिंत बांधण्याचा नियम आहे. मात्र बहुतांश ढिगारे बेंचेस पद्धतीने उभारण्यात आले नाहीत किंवा त्या ढिगाºयाभोवती संरक्षण भिंतदेखील बांधण्यात आली नाही. त्यामुळे या ढिगाºयावरून वाहणारे पाणी थेट शेतात जाते किंवा शेतातून पाण्याचा निचरा होत नाही.जंगली श्वापदांकडून पिकांची नासाडीवेकोलिने उभ्या केलेल्या मातीच्या अनेक ढिगाºयावर वेकोलिने वृक्षारोपण केले. मात्र त्यामुळे शेतकºयांपुढे जंगली श्वापदांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ढिगाºयाच्या काठालगत असलेल्या शेतांमध्ये पावसामुळे पाणी साचतेच सोबतच या ढिगाºयांवरील झुडपे जंगली श्वापदांची वस्तीस्थाने बनली आहेत. पीक भरीवर आले की, या झुडपांत वास्तव्याला असलेले रोही, रानडुकरे शेतातील पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करीत आहेत.