ऑनलाईन लोकमतढाणकी : उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील सोनदाभी गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. व्याकूळ झालेल्या या गावातील नागरिकांनीच आपला पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. श्रमदान व लोकसहभागातून एक किलोमीटर अंतरावरील विहिरीत पाणी गावात आणले आणि पाणी समस्या मिटविली. यासाठी त्यांना पाणी फाऊंडेशनने सहकार्य केले.सोनदाभी येथे बंदी भागातील दुर्गम गाव. पाणीपुरवठ्यासाठी १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीने गतवर्षी विहिरीचे खोदकाम केले. विहिरीला पाणीसुद्धा लागले. परंतु विहीर गावापासून एक किलोमीटर दूर आहे. त्यातच पाईपलाईनचे काम पूर्ण झाले नाही. आडात आहे, पण पोहºयात नाही, अशी अवस्था येथील गावकऱ्यांची झाली होती. उन्हात एक किलोमीटरवरून पाणी आणणे शक्य नव्हते. त्यामुळे गावकरी तहानेने व्याकूळ झाले होते.शासनाची प्रतीक्षा न करता गावकºयांनीच पाणी प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला. पाणी फाऊंडेशनचे संतोष गवळे, चिंतामणी पवार, मनीष मालोकार, मधुकर लिंगदे यांनी गावकºयांशी चर्चा केली. जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. त्यांनी मदतीची आश्वासन दिले. पाणी फाऊंडेशनने गावकऱ्यांसमोर श्रमदान व लोकसहभागाची संकल्पना मांडली. भगवानसिंग साबळे, मारोती पिलवंड, अशोक घोगेवाड, नूरसिंग साबळे, देवानंद वाढेकर, युवराज साबळे, नानकसिंग बस्सी, अज्ञानसिंग जोडवे, काशीराम साबळे, शिवाजी काळबांडे, चंद्रसिंग पडवाळे यांनी पुढाकार घेऊन गावातील लोकांकडून पाईप जमा केले. श्रमदानातून पाईप टाकून विहिरीतील पाणी गावापर्यंत पोहोचले आणि पाणीटंचाईवर मात केली.गावकऱ्यांचे परिश्रमसोनदाभी येथील गावकऱ्यांनी श्रमदान केल्यामुळे गावाला आज मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. प्रशासनाची प्रतीक्षा करीत बसले असते तर गावकऱ्यांना उन्हाळ्यात पाणीही मिळाले नसते. गावकऱ्यांच्या परिश्रमाचे चीज झाल्याचे समाधान आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
सोनदाभीत लोकसहभागातून पाणीटंचाईवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:25 IST
उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील सोनदाभी गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. व्याकूळ झालेल्या या गावातील नागरिकांनीच आपला पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला.
सोनदाभीत लोकसहभागातून पाणीटंचाईवर मात
ठळक मुद्देगावकऱ्यांना दिलासा : पाणी फाऊंडेशनची प्रेरणा, एक किमीवरून आणले पाणी