शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पाचशेवर अतिक्रमण ध्वस्त

By admin | Updated: April 26, 2017 00:15 IST

नगरपरिषदेने अतिक्रमणाच्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली असून गत दोन दिवसात शहरातील तब्बल पाचशेच्यावर

मुख्य बाजारपेठेत बुलडोजर : पुसद नगरपरिषदेच्या कारवाईने धाबे दणाणले पुसद : नगरपरिषदेने अतिक्रमणाच्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली असून गत दोन दिवसात शहरातील तब्बल पाचशेच्यावर अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात आले. मंगळवारी शहरातील मुख्य बाजारपेठेतील कापड लाईनमधील अतिक्रमण हटविण्यात आले. अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले असून अनेकांनी स्वत:हून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. पुसद शहरात गत कित्येक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. अतिक्रमणामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडत होती. यावर उपाय म्हणून नगरपरिषदेने सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. गेल्या कित्येक वर्षानंतर ही धडक मोहीम शहरात सोमवारपासून राबविली जात आहे. सोमवारी तहसील कार्यालय परिसर, महात्मा फुले चौक, कारला रोड, बसस्थानक परिसरात, छत्रपती शिवाजी चौक आदी ठिकाणचे २५० अतिक्रमणे हटविण्यात आली. मंगळवारी सकाळी १० वाजता पुन्हा या मोहिमेला प्रारंभ झाला. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार संजय गरकल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता रवींद्र मालवत, जुगल जाधव यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल, ठाणेदार वाघु खिल्लारे, प्रकाश शेळके यांच्या उपस्थितीत अतिक्रमणावर बुलडोजर चालविणे सुरू झाले. शहरातील महात्मा गांधी चौक, लोकहित विद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष चौक, छत्रपती शिवाजी चौक, कापड लाईन, नगिना चौक, आझाद चौक आदी भागातील अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. दुसऱ्या दिवशी तब्बल ३०० अतिक्रमण काढण्यात आली. या कारवाईत अभियंता एस.एस. जहागीरदार, शिवकांत पांडे, आरोग्य विभागाचे सुभाष राठोड, जय उंटवाल, नटवर उंटवाल, किरण आत्राम, सुभाष पवार, दिनेश राठोड आदी सहभागी झाले होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. (प्रतिनिधी) तीन बुलडोजर १२० कर्मचारी पुसद शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत नगरपरिषदेचे तीन बुलडोजर, दोन मेटॅडोअर, तीन ट्रॅक्टर, अग्नीशमन बंब यांच्यासह आरोग्य विभागाचे १२० कर्मचारी सहभागी झाले आहे. शहरात हा ताफा निघतो तेव्हा अतिक्रमणधारकांमध्ये चांगलीच धडकी भरते. अनेक जण स्वत:हून अतिक्रमण काढण्यासाठी पुढे येत आहे.