शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

३६ सहकारी संस्थांकडे १०० कोटी रुपये थकीत

By admin | Updated: June 15, 2017 00:57 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ३६ सहकारी संस्थांकडे तब्बल शंभर कोटी रुपये थकीत असल्याचे पुढे आले आहे.

जिल्हा बँक : साखर कारखाना, जिनिंग, पगारदार संस्थांचा समावेश लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ३६ सहकारी संस्थांकडे तब्बल शंभर कोटी रुपये थकीत असल्याचे पुढे आले आहे. राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दहा लाखांपेक्षा अधिक रक्कम थकीत असलेल्या संस्था व सभासदांची तत्काळ माहिती मागितली. त्या अनुषंगाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने हिशेब तपासला असता ३६ संस्थांकडे दहा लाखांपेक्षा अधिक रक्कम थकीत आहे. त्यांच्याकडील थकबाकीचा हा आकडा शंभर कोटींवर पोहोचला आहे. त्यात पोफाळीच्या वसंत सहकारी साखर कारखान्याकडील ३३ कोटींच्या रकमेचा समावेश आहे. याशिवाय दारव्हा, यवतमाळ, आर्णी व बाभूळगाव येथील चार जिनिंग प्रेसिंग संस्थांकडे सुमारे ३० कोटींची रक्कम थकीत आहे. दारव्हा येथील पगारदार संस्थेकडे १८ कोटी थकीत आहे. सर्वसेवा व्यापार संकुलाकडे पाच कोटी, महागावातील सहकारी संस्थेकडे ४० लाख थकलेले आहेत. राळेगाव ग्रामीण पतसंस्था व आणखी काही सहकारी संस्थांचा समावेश आहे. जिनिंग प्रेसिंग पैकी कुठे अवसायक तर कुठे प्रशासक नियुक्त आहेत. शासन कर्जमाफीच्या दृष्टीने अभ्यास करीत असताना जिल्हा बँकांकडे थकीत असलेल्या रकमेचा मोठा आकडा पुढे आला. म्हणूनच ही थकबाकी नेमकी कुणाकडे व केव्हापासून याची तपासणी केली जात आहे. ८० सभासद नऊ कोटींचे थकबाकीदार ८० वैयक्तिक सभासदांकडे आठ ते नऊ कोटी रुपयांची थकबाकी आहे. संस्था व सभासदांमिळून थकीत असलेले ११० कोटी रुपये जवळपास बुडित असल्याचे मानले जाते. हे ११० कोटींचे कर्ज जिल्हा बँकेच्या दप्तरी एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेट) म्हणून नोंद आहे. त्याच्या वसुलीसाठी बँकेने खूप आक्रमक भूमिका घेतल्याचे ऐकिवात नाही, कारण यातील अनेक संस्थांवर बँकेच्या संचालकांपैकी व राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे वर्चस्व राहिलेले आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी लिलाव प्रक्रियेची तयारी केली होती. मात्र मधातच कर्जमाफीची घोषणा झाल्याचा दावा बँकेकडून करण्यात आला. उपरोक्त संस्था व सभासदांकडे वर्षानुवर्षाची थकबाकी आहे. वणी विभागात थकबाकीचा हा आकडा कमी असल्याचे सांगितले जाते.