शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पुसद, उमरखेड, दिग्रस व महागाव तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:00 IST

प्रशासन उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. मात्र दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाचीही पाचावर धारण बसली आहे. पुसदमधील आसारपेंड येथील वसतिगृह व आयुर्वेदिक रुग्णालय, उमरखेडमधील मरसूळ, दिग्रस आणि महागाव येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार केले जात आहे. काही रुग्णांना उपचारार्थ यवतमाळला पाठविण्यात येत आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच मृत्यूसंख्येतही वाढ होत आहे.

ठळक मुद्देदिग्रसमध्ये भडका । महागावातही संख्येत वाढ, प्रशासनाची उडाली तारांबळ

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद/उमरखेड : पुसद आणि उमरखेड उपविभागात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. शुक्रवारी एकाच दिवशी दिग्रस, पुसद, उमरखेड आणि महागावमधील ५२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.गेल्या महिन्यापासून पुसद, दिग्रस, उमरखेड आणि महागाव तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी एकाच दिवशी या चारही तालुक्यातील ५२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सर्वाधिक दिग्रस तालुक्यातील दहा पुरुष व १२ महिला अशा २२ जणांचा समावेश आहे. महागावमधील ११ पुरुष आणि दोन महिला, उमरखेडमधील दहा पुरुष आणि एक महिला तर पुसदमधील चार पुरुष आणि दोन महिलांचा यात समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची तारांबळ उडत आहे.प्रशासन उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. मात्र दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाचीही पाचावर धारण बसली आहे. पुसदमधील आसारपेंड येथील वसतिगृह व आयुर्वेदिक रुग्णालय, उमरखेडमधील मरसूळ, दिग्रस आणि महागाव येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार केले जात आहे. काही रुग्णांना उपचारार्थ यवतमाळला पाठविण्यात येत आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच मृत्यूसंख्येतही वाढ होत आहे. एकट्या पुसद तालुक्यात आतापर्यंत कोरोनाने १८ जणांचे बळी घेतले. पुसद तालुक्यात तूर्तास १२१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे. एकूण बाधितांची संख्या ६१६ वर पोहोचली आहे. पुसद येथील स्टेट बँकेच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने बँकेने पुढील सूचनेपर्यंत कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान पुसदमध्ये शनिवारी २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.हिवरा संगम येथे कोरोनाचा शिरकावमहागाव तालुक्यातील हिवरा संगम येथेही शनिवारी कोरोनाने शिरकाव केला. हिवरा ही आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची मुख्य बाजारपेठ आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र आजपर्यंत हिवरा येथे कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. शुक्रवारी सायंकाळी कोरोनाचा रुग्ण आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे. गावातील २० ते २५ जणांना तपासणीसाठी महागाव येथील कोविड सेंटरमध्ये पाचारण केले आहे. हिवरा येथील एकविरानगरमधील काही भाग प्रतिबंधित करण्यात आला. नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जब्बार पठाण यांनी केले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या