शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आर्णीत वाहतूक नियंत्रणाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 22:10 IST

शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. वाहतूक पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेमुळे वाहतूक व्यवस्थाच नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसत अहे.

ठळक मुद्देट्रॅव्हल्सधारकांना अभय : दुचाकीस्वारांवर कारवाई, किरकोळ अपघात नित्याचेच

हरीओमसिंह बघेल ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. वाहतूक पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेमुळे वाहतूक व्यवस्थाच नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसत अहे.शहरात एकच मुख्य रस्ता आहे. याच परिसरात मुख्य बाजारपेठ आहे. यामुळे हा रस्ता नेहमीच गर्दीने फुललेला असतो. त्यावरून होणाºया अनियंत्रित वाहतुकीने आता नागरिक बेजार झाले अहे. विद्यार्थी, महिलांची कुचंबणा होत आहे. वाहतूक नियंत्रित करण्यात वाहतूक पोलीस अपयशी ठरत आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.वाहनधारकांवर पोलिसांचा कोणताही ‘अंकुश’ नाही. उलट अवैध वाहतूक ही अंडे देणारी कोंबडी असल्याने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. पोलीस यंत्रणा या कोंबडीला जिवंत कसे ठेवता येईल, यासाठीच प्रयत्न करताना दिसत आहेत. वाहतूक पोलीस महिन्याकाठी लाखो रूपयांची माया गोळा करण्यातच व्यस्त असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मुख्य रोडवरील बसस्थानक परिसर वर्दळीचा आहे. मात्र वाहतूक पोलीस तेथे कधीच दिसून येत नाही. ते शहराबाहेर उभे राहून दुचाकीस्वारांना पकडून धमकाविण्यातच धन्यता मानत आहे.शहरात बस्स्थानकासमोरच ट्रॅव्हल्सवाल्यानी हैदोस घातला आहे. बसस्थानकापासून शंभर मीटरच्या पलीकडे ट्रॅव्हल्स ऊभी करावी, असा नियम आहे. मात्र वाहतूक शिपायांच्या आशीर्वादाने ट्रॅव्हल्स चालक बस्स्थानकासमोरच वाहन ऊभे करुन प्रवासी भरताना दिसत आहे. यामुळे अनेकदा बस पास होताना अपघात झाले आहे.या परिसरात विद्यार्थ्यांचे सतत अपघात होत आहे. तरीही वाहतूक पोलीस ट्रॅव्हल्सवाल्यांना अभय देताना दिसत आहे. यामुळे आर्णीकर जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे एखादवेळी मोठा अपघात होऊन नाहक निष्पाप जिवांचे बळी जाण्याची शक्यता बळावली आहे.अवैध वाहनधारकांशी लागेबांधेगेल्या अनेक वर्षांपासून शहरात तेच ते वाहतूक पोलीस दिसत आहे. यातून त्यांचे अवैध वाहतूकदारांशी लागेबांधे निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस अवैध वाहतूकदारांवर कारवाई करताना दिसतच नाही. उलट ट्रॅव्हल्सच्या वाहतुकीला सुरक्षा पुरविताना दिसत आहे. याकडे ठाणेदारांनी लक्ष देण्याची गरज अहे. किमान बसस्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर करून सामान्य वाहनधारक आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Travelप्रवास