शाळेबाहेरचे बाळकडू : नेत्याचा मुलगा राजकारणाचे बाळकडू घेतो अन् झटकन् मंत्री होतो. अभिनेत्याचा मुलगा वयात येण्यापूर्वीच हिरोगिरी करू शकतो. पण मजुराच्या मुलाला मजूर होण्याची इच्छा नसतानाही बापासोबत मजुरीचेच धडे गिरवावे लागतात. शाळेबाहेरच्या या खडतर ‘प्रशिक्षणा’त चिमुकल्या जिवाला क्षणभर झोप आली, तरी ‘प्रशिक्षका’ला थांबता येत नाही. गुरुवारी बाभूळगावच्या रस्त्यावर हे चित्र टिपले असलेतरी देशाच्या कानाकोपऱ्यात कष्टकरी बाप-लेकांच्या अशा जोड्या आजही आहेत.
शाळेबाहेरचे बाळकडू :
By admin | Updated: November 27, 2015 02:36 IST