शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजार कोटींच्या पॅकेजमधून विदर्भाला केवळ साडेसात कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 12:44 IST

vidarbha Yawatmal news अतिवृष्टीग्रस्तांसाठी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या दहा हजार कोटींच्या पॅकेजमधून विदर्भाच्या वाट्याला फक्त सात कोटी ३२ लाख ९० हजार रुपये येणार आहे.

ठळक मुद्देम्हणे, केवळ भंडारा जिल्ह्यातच नुकसानअमरावती विभागात घरे, भांड्यांचीच हानी

 लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : अतिवृष्टीग्रस्तांसाठी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या दहा हजार कोटींच्या पॅकेजमधून विदर्भाच्या वाट्याला फक्त सात कोटी ३२ लाख ९० हजार रुपये येणार आहे. सरकारच्या लेखी केवळ भंडारा जिल्ह्यातच नुकसान झाले. इतर ठिकाणी घरे, भांडी आदी वस्तूंच्याच नुकसानीची नोंद आहे. नेहमीप्रमाणे याहीवेळी विदर्भावर मदतीत अन्याय झाला आहे. 

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी सरकारने मदत जाहीर करताना विदर्भातील दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम, तर नागपूर विभागात नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यात शेतीचे कवडीचेही नुकसान झाले नसल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

भंडारा जिल्ह्यात शेतीचे केवळ दोन कोटी ११ लाख ४३ हजारांचेच नुकसान झाले. घरे, कपडे, भांडी आदी बाबींचे १९ लाख ८५ हजार, मृत जनावरांचे पाच लाख ८२ हजार, तर मोठ्या प्रमाणातील पडझडीचे नुकसान दोन कोटी ८६ लाख ५६ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमिळून एक कोटी ९४ लाख ५२ हजार रुपये इतकेच नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अमरावती व अकोला या दोन जिल्ह्यात चार लाख ८२ हजार रुपयांचे नुकसान दर्शविण्यात आले आहे. आठ जिल्ह्यांमध्ये एकही जनावर मृत्यूमुखी पडले नाही, असे सरकारचे सर्वेक्षण आहे. उर्वरित महाराष्ट्राला मोठा वाटासरकारने जाहीर केलेल्या दहा हजार कोटींच्या पॅकेजमधील मोठा वाटा उर्वरित महाराष्ट्राला मिळणार आहे. महाराष्ट्र आणि विदर्भ यांच्यात या रकमेचे वाटप विसंगत पद्धतीने होणार आहे. उर्वरित महाराष्ट्राला जिरायतीसाठी हेक्टरी एक हजार, तर फळपिकासाठी २५ हजार रुपये मिळणार आहे. सनदी अधिकाऱ्यांनी केलेले पंचनामे सदोष असल्याचा आराेप होत आहे.पॅकेजमध्ये विदर्भावर अन्याय झाला आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मुंबईत दाखल झालो आहे. काही जिल्ह्यात शेतीचे एक रुपयाचेही नुकसान झाले नाही हे कसे शक्य आहे.- किशोर तिवारी, अध्यक्ष, शेतकरी स्वावलंबन मिशन

टॅग्स :agricultureशेती