आमची माती आमची माणसं : आत्महत्यांची अपचर्चा कितीही होत असली, तरी जिल्ह्यातली मातीमाय समृद्धच आहे. एक बी पेरल्यावर लाखो बिया देण्याचा तिचा रतीब कायमच आहे. उत्पादनाची वानवा कधीच नव्हती. बोंब आहे ती उत्पन्नाची. शासन-प्रशासन आणि व्यापारी-दलाल यांच्या धोरणदुष्काळाने शेती नागवली. पण कास्तकार गडी मातीचे राखण करण्यासाठी सज्ज आहे. त्याच्या शिवारातली आटाळी (मचाण) जोवर खंबीर उभी आहे, तोवर तरी देशावर उपाशी मरण्याची नौबत ओढवणार नाही !
आमची माती आमची माणसं :
By admin | Updated: December 16, 2015 02:40 IST