शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी दुसरीकडे, वेतन पालिकेतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 23:30 IST

वणी नगरपालिकेतून अन्य नगरपालिकामध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या अधिकाºयांचा पगार वणी नगरपालिकेतून अदा केला जात आहे. हा प्रकार नियमाला बगल देऊन होत असल्याने पालिकेला लाखो रूपयांचा फटका बसला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : लाखो रूपयांची उचल, १० महिन्यांपासूनचा प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी नगरपालिकेतून अन्य नगरपालिकामध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या अधिकाºयांचा पगार वणी नगरपालिकेतून अदा केला जात आहे. हा प्रकार नियमाला बगल देऊन होत असल्याने पालिकेला लाखो रूपयांचा फटका बसला आहे. हे प्रकरण आता जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचले आहे. याप्रकरणात आता काय कारवाई होते, याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.वणी नगरपरिषदेत कार्यरत काही अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील वेगवेगळ्या नगरपालिकांमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. हे अधिकारी वणी नगरपालिकेत केवळ दोन दिवस सेवा देतात. अन्य दिवशी ते प्रतिनियुक्ती दिलेल्या नगरपालिकेत कार्यरत राहतात. नियमानुसार ज्याठिकाणी जितके दिवस कर्तव्य बजावले, तितक्या दिवसांचा पगार संबंधित नगरपालिकेने अदा करावा, असा नियम आहे. मात्र या नियमाला पायदळी तुडवून प्रतिनियुक्तीवर पाठविलेल्या या अधिकाºयांचे सरसकट वेतन वणी नगरपालिकेतून काढण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर नगरसेवक पी.के.टोेंगे यांनी यासंदर्भात थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.या अधिकाऱ्यांना ज्या नगरपालिकेत प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे, त्या नगरपालिकेकडून कर्तव्य बजावलेल्या दिवसांचे वेतन वणी नगरपालिकेकडे वळते करावे, अशी मागणी टोंगे यांनी तक्रारीतून केली आहे. वणी नगरपालिकेतील कर निर्धारक या पदावर कार्यरत राजकुमार भगत यांना जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. त्यांचे वेतन व भत्ते त्यांच्या मूळ आस्थापनेवरून अदा करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे. मात्र तसा नियमच नसल्याचा दावा पी.के.टोंगे यांनी तक्रारीतून केला आहे. भगत यांनी गेल्या १० महिन्यात वणी पालिकेत केवळ आठवड्यातून दोन दिवस दिली असताना त्यांना तीन लाख ८० हजार रूपये वेतन अदा करण्यात आले. वणी नगरपालिकेतील स्थापत्य अभियंता गिरीष डुबेवार यांना दिग्रस नगरपालिकेत पाठविले. त्यांचेही वेतन वणी पालिकेतूनच केले जात असल्याने वणी पालिकेला आर्थिक फटका बसला.वणीतील अधिकाºयांच्या नियुक्त्या गृहतालुक्यात!राजकुमार भगत, गिरीष डुब्बेवार व कीर्ती जावळे यांच्या नियुक्त्या जाणिवपूर्वक त्यांच्या गृह तालुक्यात करण्यात आल्या आहे. यामागेही मोठे षडयंत्र असण्याची शक्यता टोंगे यांनी तक्रारीतून व्यक्त केली आहे. याबाबत चौकशी करण्याची मागणी आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ