शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
3
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
4
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
5
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
6
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
7
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
8
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
9
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
10
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
11
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
12
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
13
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
14
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
15
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
16
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
17
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
18
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
19
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
20
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू

अनाथांचा पुरवला बालहट्ट

By admin | Updated: November 10, 2015 03:13 IST

मध्यवस्तीत असूनही ती इमारत तशी वर्दळीपासून दोन हात दूरच. यवतमाळातल्या माणसांची तिकडे फारशी नजर वळत नाही.

ढोल-ताशा पथक : अनाथालयावर रोषणाई, वर्षभराचे धान्य, फटाके वाटपयवतमाळ : मध्यवस्तीत असूनही ती इमारत तशी वर्दळीपासून दोन हात दूरच. यवतमाळातल्या माणसांची तिकडे फारशी नजर वळत नाही. अनाथ मुलींचे ते घर. पण रविवारी या घरावर रोषणाई करण्यासाठी काळ्या टी-शर्टमधली तरुणाई धडपडत होती. जिथे आई-बाबा हे नातेच माहिती नाही, तिथल्या बहिणींसाठी काही भाऊ आले होते, थेट नागपुरातून!मायापाखर बालगृह नावाचे हे घर. तब्बल १७ अनाथ मुलींचा हा आसरा. बालगृहाचे व्यवस्थापन या मुलींसाठी झटतेच. पण त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांतून कधी मायेचा ओलावा पाझरत नाही. पण नागपूरच्या तरुणाईने यवतमाळातील ‘मायापाखर’चा शोध घेतला. शिवसंस्कृती ढोल-ताशा पथकाचे हे तरूण रविवारी यवतमाळात पोहोचले. बालगृहातील निरागस मुलींना आश्चर्याचा धक्काच बसला. काही कळायच्या आत या तरुणांनी संपूर्ण इमारतीवर दिवाळीनिमित्त खास रोषणाई केली. घरोघरी दिवाळीची सजावट सुरू असताना या अनाथांच्या घरातही सजावट होऊ लागली. अनाथ जीव हरखून गेले. संपूर्ण रोषणाई झाल्यावर अनाथ मुलींना थंडीत संरक्षणासाठी ब्लँकेट वाटप करण्यात आले. दिवाळी साजरी करता यावी यासाठी फटाके, अभ्यंगस्नानासाठी उटणे, मोती साबण, दिवे, मिठाई, चॉकलेट्स देण्यात आले. त्यांच्या शिक्षणाला मदत म्हणून वह्या पुस्तकेही देण्यात आली. एवढेच नव्हेतर वर्षभर पुरेल एवढा धान्यसाठा बालगृहाला देण्यात आला. शिवसंस्कृती ढोल-ताशा पथकाच्या या अवचित भेटीने मायापाखर बालगृहात रविवारी खऱ्या अर्थाने दिवाळी अवतरली होती. एकीकडे समाजात एकलकोंडेपणा वाढत असताना शिवसंस्कृती ढोल-ताशा पथकाच्या तरुणांनी दाखविलेले औदार्य महत्त्वपूर्ण आहे. तरुण वयात मुलं कमाईला लागतात. मात्र या पथकातील १८० तरुण कमावण्यापेक्षा वाटण्यावर जोर देतात. ढोल वादनातून मिळविलेल्या रकमेतून उपेक्षितांना मदत करणे, हाच त्यांचा अजेंडा आहे. विशेष म्हणजे, या तरुणांनी आपल्यापैकीच काही जणांची चमू बनवून विदर्भभरात कोणत्या ठिकाणी मदत करता येईल, याचा शोध घेतला. गेल्या तीन महिन्यांपूर्वी त्यांनी यवतमाळातील मायापाखर या बालगृहाची मदतीसाठी निवड केली. त्यानंतर या ठिकाणच्या मुलींना कोणत्याप्रकारे मदत करता येईल, त्याची तजविज केली. सर्व व्यवस्था झाल्यावर रविवारी सकाळीच नागपुरातून या पथकातील प्रसाद मांजरखेडे, सुमंत ठाकरे, प्रसाद पाचखेडे, प्रकाश दुर्गे, श्रेयस फाटे यांच्यासह ३० तरुण यवतमाळात पोहोचले. एका वाहनात कपडे, धान्य व इतर मदतीचे साहित्य घेऊन आले. पण केवळ मदत देणे आणि निघून जाणे एवढे मर्यादित स्वरुप या कार्यक्रमाचे नव्हते. तर शिवसंस्कृतीच्या तरुणांनी दिवाळीचा प्रसंग लक्षात घेऊन संपूर्ण बालगृहाची सजावट केली. आपण अनाथांना मदत देतोय यापेक्षा आपण आपले कर्तव्य बजावतोय, हीच भावना त्यांच्या वर्तनात होती. (स्थानिक प्रतिनिधी)