शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पुसद येथे धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे आयोजन

By admin | Updated: April 6, 2017 00:39 IST

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुसद येथे धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे आयोजन ७ ते १३ एप्रिलपर्यंत करण्यात आले आहे.

७ ते १३ एप्रिल : विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम, १४ एप्रिल रोजी अभिवादन रॅली पुसद : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुसद येथे धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे आयोजन ७ ते १३ एप्रिलपर्यंत करण्यात आले आहे. यानिमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित आहेत. महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे उद्घाटन ७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता आमदार मनोहरराव नाईक यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रा.अशोक गोरघाटे ‘भारतीय संविधाननिर्मिती : स्वरूप आणि अपेक्षित गणराज्य’ या विषयावर बीजभाषण करतील. ८ एप्रिल रोजी मुंबई येथील सुनील कदम यांचे ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र उभारणीतील योगदान’ या विषयावर तर वर्धाचे सुधीर भगत ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. ९ एप्रिल रोजी नागपूर येथील डॉ.प्रकाश खरात ‘फुले-आंबेडकरी विचार-सांस्कृतिक वारसा’ आणि अभय देवरे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रशासनातील संधी’ या विषयावर मार्गदर्शन करतील. १० एप्रिल रोजी पुणे येथील डॉ.श्रीपाल सबनीस ‘राष्ट्रभक्त आंबेडकर आणि भारताचे भविष्य’ या विषयावर व्याख्यान देणार आहे. १२ एप्रिल रोजी मुंबईचे प्रा.आनंद देवडेकर ‘आंबेडकरवादी राजकारण - तत्त्व आणि व्यवहार’ या विषयावर मार्गदर्शन करतील. सदर सर्व कार्यक्रम पुसद पंचायत समितीच्या शिवाजी सभागृहात दररोज सायंकाळी ६ वाजता होणार आहे. ११ एप्रिल रोजी मिलिंद जाधव प्रस्तूत सूफी बुद्ध-भीमगीतांचा अनोखा नजरांना ‘दुनिया मे भीमजी महान’ आणि १३ एप्रिल रोजी कव्वाल खालीद शैदा यांचा बुद्ध-भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम ‘सुनोजी हम जय भीमवाले है’चे आयोजन करण्यात आले आहे. सदर दोन्ही कार्यक्रम यशवंत रंग मंदिरात होणार आहे. १४ एप्रिल रोजी सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण, मानवंदना आणि मोटरसायकल रॅली काढण्यात येईल. तसेच दुपारी भव्य अभिवादन रॅली काढण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांची जय्यत तयारी झाली असून महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मिलिंद हट्टेकर यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. पुसदकरांना यानिमित्ताने प्रबोधनाची मेजवानी मिळणार आहे. (प्रतिनिधी)