१ जानेवारी : भीम टायगर सेनेचे आयोजन पुसद : येथील भीम टायगर सेनेच्यावतीन भीमा कोरगाव शौर्यदिनाचे आयोजन १ जानेवारी रोजी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे करण्यात आले असून, यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके उपस्थित राहणार आहे. उद्घाटन प्रज्ञापर्वाचे अध्यक्ष डॉ. राजेश वाढवे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वजाहत मिर्झा, बसपाचे जिल्हाध्यक्ष तारीक लोखंडवाला, अॅड़ सचिन नाईक, नगरसेवक अर्जुनराव लोखंडे, विष्णू शिकारे, दत्ता गंगाळे, पंचशीला कांबळे, दीपाली धुळे, बहुजन मुक्ती पार्टीचे गणपतराव गव्हाळे, सुनील पाझारे, साकीब शहा, महेश खडसे, पंजाबराव कांबळे, सुमेध पेटकर, सुमेध कांबळे, सुधीर देशमुख, विश्वास भवरे, पांडुरंग व्यवहारे, विजयकुमार हेंगडे, बापू किरवले, अॅड़ रवी वाघमारे, अॅड़ आरिफ अहमद, अॅड़ अर्जुन राठोड, विनोद फुलमाळे आदी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे. १ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता पुसद येथील तीन पुतळा परिसरातून रॅली काढण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रॅलीचा समारोप होईल. त्यानंतर भीमा कोरेगाव दिनानिमित्त शूरविरांना मानवंदना दिली जाईल. दुपारी ३ वाजता भीम टायगर सेनानिर्मित दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्यांचा सत्कार करण्यात येईल. सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध गायक प्रेम धांदे व संचाचा भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ््याला उपस्थित राहण्याचे आवाहन भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे आयोजन
By admin | Updated: December 30, 2016 00:18 IST