शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त गाळे रिकामे करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 22:05 IST

शहरातील गांधी चौकातील नगरपालिकेचे १६० गाळे तातडीने रिकामे करून ते गाळे जाहिर लिलाव अथवा ई-निविदाद्वारे ३० वर्षांसाठी भाडे पट्ट्याने देण्यात यावे, असा आदेश नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी शुक्रवारी दिला. तसा अध्यादेशही जारी करण्यात आला आहे.

ठळक मुद्देवणीच्या व्यापाऱ्यांमध्ये खळबळ : नगरविकास मंत्रालयाने दिला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शहरातील गांधी चौकातील नगरपालिकेचे १६० गाळे तातडीने रिकामे करून ते गाळे जाहिर लिलाव अथवा ई-निविदाद्वारे ३० वर्षांसाठी भाडे पट्ट्याने देण्यात यावे, असा आदेश नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी शुक्रवारी दिला. तसा अध्यादेशही जारी करण्यात आला आहे.हा आदेश सोमवारपर्यंत वणी नगरपालिकेकडे पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निर्णयामुळे वणीतील संबंधित व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून या निर्णयावर स्थगनादेश आणण्यासाठी संबंधित व्यापाऱ्यांनी हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. संबंधित १६० गाळ्यांचा पुन्हा लिलाव करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका नगरसेवक पी.के.टोंगे यांनी दाखल केली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश नगरविकासमंत्र्यांना दिले होते. त्यानंतर नगरविकासमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी संबंधित व्यापारी, याचिकाकर्ते पी.के.टोंगे व पालिकेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर ना.रणजित पाटील यांनी याप्रकरणावर निकाल देत सदर १६० गाळे तातडीने रिकामे करून घेण्याचा आदेश नगरपालिकेला बजावला आहे.वणी नगरपरिषदेच्या शिट क्रमांक १९ (अ) व १९ (ब) मधील जमीन मध्यप्रदेश सरकारने २३ फेब्रुवारी १९५६ मध्ये यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शिफारशीवरून वणी नगरपरिषदेला हस्तांतरीत केली होती. त्यानंतर नगरपालिकेने २५ हजार ५०० चौरस फूट जागेवर १६० गाळ्यांचे बांधकाम केले. १९९५६ साली या गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर निवार्सीतांकरिता ३० रूपये व इतरांकरिता १०० ते ३०० रूपयापर्यंत वार्षिक भाडे आकारून गाळ्यांचे वाटप करण्यात आले. वेळोवेळी अल्प प्रमाणात या भाड्यात वाढ करण्यात आली. २०१२ मध्ये ही वाढ तीनपट झाली. भाडेवाढीसंदर्भात पी.के.टोंगे यांनी २०१४ मध्ये याचिका दाखल केली होती. त्यात टोंगे यांना प्रादेशिक संचालक न.प.प्रशासन अमरावती व जिल्हाधिकारी यवतमाळ यांचा संदर्भ दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर यवतमाळच्या जिल्हाधिकाºयांनी गाळेधारकाकडून सदर गाळे रिकामे करण्याचे आदेश दिले होते. परंतु गाळेधारक नंदकिशोर खत्री व सुभाष गेलडा यांनी २०१५ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याच काळात शिवलामल शुगवाणी व गुरूमुख केशवानी यांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे अपिल दाखल केली होती. त्यावर निर्णय होऊन गाळेधारकांना गाळ्यांचे मुल्यांकन करून भाड्याची आकारणी करावी व ३० वर्षाकरिता ते गाळे त्याच व्यापाºयांना भाडे पट्ट्यावर देण्यात यावे, असे आदेश सन २०१५ मध्ये देण्यात आले होते. त्याविरोधात पी.के.टोंगे यांनी उच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल केली. त्यावरून उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश नगरविकासमंत्र्यांना दिले होते.

टॅग्स :ministerमंत्री