शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंत’ला जप्तीचे आदेश

By admin | Updated: May 21, 2016 02:36 IST

वसंत सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांना एफआरपीनुसार (रास्त भाव) फरकाचे ५५ लाख रुपये दिले नाही ...

एफआरपीचे प्रकरण : शेतकऱ्यांचे ५५ लाख भरलेच नाही उमरखेड : वसंत सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांना एफआरपीनुसार (रास्त भाव) फरकाचे ५५ लाख रुपये दिले नाही म्हणून साखर आयुक्तांनी वसंत कारखान्यावर जप्तीचे आदेश बजावले आहे. यामुळे ऊस उत्पादक, कामगार आणि नवनियुक्त संचालक मंडळात खळबळ उडाली आहे.वसंत सहकारी साखर कारखान्याचे २०१५-१६ या हंगामात कधी नव्हे ते सर्वात कमी गाळप झाले. १३ हजार ६०० टन ऊस गाळप केला. कारखान्याने गाळप केलेल्या उसाचे पीक एफआरपीनुसार ८० टक्के पेक्षा कमी देऊ नये असा आदेश साखर आयुक्त पुणे यांनी एका नोटीसद्वारे ‘वसंत’ला कळविले होते. परंतु कारखान्याने ऊसाला १९०५ प्रति टन हमी भाव ठरविलेला असतानासुद्धा प्रति टन १५०० रुपयेच दिला. एकूण १५२५ रुपये प्रमाणे दर देणे आवश्यक होते. परंतु कारखाना आर्थिक डबघाईस असल्याने शेतकऱ्यांंना ही रक्कम मिळाली नाही. परिणामी ५५ लाख रुपये शेतकऱ्याची रक्कम थकीत आहे. त्यातच वसंत कारखान्याची निवडणूक लागली. या गडबडीत ५५ लाख रुपये भरले नाही. त्यानंतर साखर आयुक्तांनी १५ मेपर्यंत मुदत दिली होती. तरीही कारखाना आर्थिक अडचणीत असल्याने पैसे भरु शकले नाही. अखेर साखर आयुक्त बिपीन शर्मा यांनी गुरुवार १९ मे रोजी आदेश जारी करून कारखान्यावर जप्तीची कारवाई केली. हा कारवाई आदेश ‘वसंत’मध्ये धडकताच नव्याने नियुक्त झालेल्या संचालक मंडळात खळबळ उडाली. गेल्या पाच वर्षांपासून वसंत कारखान्याचे आर्थिक नियोजन चुकत गेले. शेवटी वसंतच्या इतिहासात प्रथमच जप्तीची कारवाई होत आहे. गेल्या १६ महिन्यांपासून कारखान्यातील कामगारांचे पगार झाले नाही. व्यापारी, ऊस तोडणी कामगार यांचे कोट्यवधी रुपये देणे बाकी आहे. वीज वितरणचेही बिल भरले नाही. ऊस उत्पादक व कामगार गेल्या दोन वर्षांपासून सैरभैर झाले आहेत. कारखान्याकडून त्यांना कोट्यवधी रुपये घेणे आहे. परंतु कारखाना प्रशासनाने आंदोलन करूनही त्यांना काहीच दिले नाही. त्यामुळे तेही संतप्त झाले आहेत. अशा स्थितीत ही कारवाई होत असल्याने आगामी गाळप हंगाम सुरू होतो की नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)