शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कंत्राटी शिक्षकांचा आदेश निघालाच, मानधन पाच हजार

By अविनाश साबापुरे | Updated: July 11, 2023 21:01 IST

तीन तालुक्यात भरणार ९३ शिक्षक

यवतमाळ : कायमस्वरुपी शिक्षक भरतीसाठी हजारो अभियोग्यताधारक उमेदवार आंदोलनाची भाषा करीत असताना जिल्हा परिषदेने मात्र कंत्राटी शिक्षक भरतीची तयारी केली आहे. कंत्राटी भरतीला विरोध होत असतानाच आता जिल्हा परिषदेने ९३ शिक्षक कंत्राटी तत्वावर भरण्याचा आदेशही जारी केला आहे. 

जिल्ह्यातील वणी, झरी जामणी आणि मारेगाव तालुक्यात हे ९३ शिक्षक कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारीच मान्यता दिली. या तीनही तालुक्यात अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता निर्माण झाली आहे. जवळपास २० शाळांमध्ये तर एकही शिक्षक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कंत्राटी शिक्षक नेमले जात असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. विशेष म्हणजे, या नियुक्त्या केवळ सहा महिन्यांसाठी म्हणजेच शैक्षणिक सत्रातील १७९ दिवसांसाठी करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशात म्हटले आहे.

या शिक्षकांना मासिक केवळ पाच हजार रुपयांचे मानधन दिले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून सहा महिन्यांसाठी २७ लाख ९० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तिन्ही तालुक्यातील रिक्त पदांचा आढावा घेऊन पदांना मान्यता देण्यात आली आहे. यात वणी तालुक्यात २८, झरी तालुक्यात ३० आणि मारेगाव तालुक्यात ३५ शिक्षक कंत्राटी तत्वावर भरले जाणार आहेत. याबाबत सीईओ डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी तीन्ही गटशिक्षणाधिकाऱ्यांना कंत्राटी शिक्षक भरती करून अहवाल सादर करण्याचे आदेश बजावले आहेत. 

एकीकडे राज्य शासनाने २० हजार रुपयांच्या मानधनावर कंत्राटी शिक्षक भरतीचा आदेश काढलेला असताना यवतमाळ जिल्हा परिषदेने मात्र पाच हजारांच्या मानधनावर तातडीने कंत्राटी भरतीचा आदेश काढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळTeachers Recruitmentशिक्षकभरती