शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता व नाली कामाच्या चौकशीचे आदेश

By admin | Updated: July 7, 2014 00:10 IST

धोत्रा येथे विविध योजनेतून सिमेंट रस्ता आणि नालीचे बांधकाम करण्यात आले. सदर काम प्राकलनानुसार झाले नसल्याने या कामाचा दर्जा अतिशय खालावला आहे. या कामांची चौकशी करण्याचे

कळंब : धोत्रा येथे विविध योजनेतून सिमेंट रस्ता आणि नालीचे बांधकाम करण्यात आले. सदर काम प्राकलनानुसार झाले नसल्याने या कामाचा दर्जा अतिशय खालावला आहे. या कामांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी दिले आहे. दरम्यान, या कामांची जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता एस.एस. तपासे, बांधकाम उपविभाग कळंबचे उपअभियंता शरद राघमवार, गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर, शाखा अभियंता विलास चावरे आणि पंचायत समितीचे शाखा अभियंता तुषार परळीकर यांनी पाहणी केली. त्यांना या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आढळून आला. गजानन दिघडे ते चिंतामण वाटकर यांच्या घरापर्यंत झालेल्या सिमेंट रस्त्याची जाडी प्राकलनानुसार नाही, गजाचा अत्यल्प वापर, नाली बांधकाम व्यवस्थित आढळून आले नाही. कानीफनाथनगर वार्ड क्रमांक ३ सरोदीपुरा येथे झालेल्या नालीमध्ये सांडपाणी सोडण्यासाठी कुठलीही व्यवस्था केली नाही. नालीचा उतार योग्य नसल्याचे चौकशीत आढळून आले. विशेष म्हणजे या कामांसाठी जवळपास १० लाख रूपये खर्च करण्यात आले. ग्रामपंचायतीमार्फत पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्द योजना, गाव तंटामुक्तीसाठी मिळालेला निधी, दलितवस्ती सुधार योजना, तांडावस्ती सुधार योजना आणि बीआरजीएफ अंतर्गत मिळालेला निधी केवळ नाली व सिमेंट रस्त्यावर खर्च करण्यात आला. सदर कामाची पाहणी केल्यानंतर अनियमितता आढळून आली. याची दखल घेत संबंधित यंत्रणेला लेखी जबाब मागू. काम व्यवस्थित करण्यासाठी सुचित केले जाईल, असे जिल्हा परिषद बांधकाम विभाग कळंबचे उपअभियंता शरद राघमवार यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)